ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी लोक वेगेवगळ्या प्रकारचे फेस पॅक आणि क्रिम्सचा वापर करतात. जेणेकरून चेहऱ्याची चमक कमी होणार नाही. घरगुती उपाय तुमची त्वचा उजळवण्यास फायदेशीर ठरू शकतात. व्हिटामीन ई ची कॅप्सूल त्वचा आणि केसांसाठी एका वरदानाप्रमाणे आहे. व्हिटामीन ई ची कॅप्सूल चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा ग्लो (Vitamin e capsule) वाढतो. याशिवाय केसांची वाढही होते. शरीरावरचे गडद डाग काढून टाकण्यासाठीही ही कॅप्सूल फायदेशीर आहे. (How to Use Vitamin E Capsule)
व्हिटामीन ई चे त्वचेसाठी फायदे (How to Use Vitamin E Capsules For Skin)
जर तुम्ही व्हिटामीन ई मध्ये लिंबू मिसळून चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील. यामुळे तेलकट त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहऱ्याची चमक वाढते. व्हिटामीन ई ची कॅप्सूल लिंबात मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो. हा उपाय ओपन पोर्स बंद करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचेला पुरेपूर पोषण मिळते. एक्जिमासारखे त्वचेचे विकार असतील तर हा उपाय रामबाण ठरतो.
त्वचेवर हा उपाय केल्यानं लाल चट्टे पडत नाही. यामुळे स्किन बर्नची समस्या होत नाही आणि खाजेवरही आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवससात चेहऱ्याला एलोवेराने मसाज केल्यास त्वचेवर वेगळी चमक येते. त्वचा टाईट (Skin Tightening) होते. यामुळे कोलोजनचं उत्पादनं वाढतं. जे त्वचेला चमकदार बनवते आणि डाग, एक्ने हटवते.
व्हिटामीन-ई कॅप्सूल केसांवर कशी वापरावी?
व्हिटामीन ई कॅप्सूल किंवा व्हिटामीन ई जेल एलोवेरासह मिसळून केसांवर लावता येते. २ चमचे एलोवेरा जेलमध्ये २ कॅप्सूल मिसळा. केसांवर एक ते दीड तास हा हेअर मास्क लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. या उपायानं केसांची चांगली वाढ होईल. एरंडेल तेल केसांसाठी उत्तम ठरते. व्हिटामीन ई जेल मिसळून केसांच्या मुळांवर मसाज करा. दोन्ही पदार्थ एकत्र मिसळून केसांवर लावा. आठवड्यातून एकदा या तेलानं केसांची मसाज केल्यास केसांना पुरेपूर फायदे मिळतील.
कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतो. यातील गुण केस वाढवण्यासाठी आणि केसांना दाट बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कांद्याच्या रसात व्हिटामीन ई मिसळून केसांवल लावा. कांद्याचा रस आणि व्हिटामीन ई हेअर ग्रोथ बूस्ट करतात. यामुळे केसांच्या सर्व समस्या कमी होतात.
स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी उपयुक्त
वजन वाढल्यामुळे किंवा प्रेग्नंसीनंतर आलेले स्ट्रेच मार्क हटवण्यासाठी व्हिटामीन ई जेल तुम्ही वापरू शकता. यात यात एलोवेरा जेल किंवा नारळाचं तेल मिसळून खुणा असलेल्या ठिकाणी लावा आणि हलक्या हातानं ५ ते १० मिनिटं मसाज करा. २ आठवडे हा उपाय केल्यास त्वचेवरचे डाग हळूहळू कमी होतील.