Join us  

त्वचेचा नैसर्गिक ग्लो हरवलाय? चेहऱ्यावर व्हिटामिन ई कॅप्सूल लावून पाहा, मग पाहा जादू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 3:14 PM

How To Use Vitamin E Capsules For Face Health व्हिटामिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर नक्की कसे लावायचे?

'चेहरा हे या चांद खिला है', असा म्हणणारा व्यक्ती कोणी नसेल तरी, 'मै अपनी फेवरीट हु' म्हणत महिला आपल्या त्वचेची काळजी घेतात. धकाधकीच्या जीवनात महिलांना स्वतःच्या त्वचेची हवी तशी काळजी घ्यायला जमत नाही. त्यामुळे काही जणी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे खर्च करतात. परंतु, ब्यूटी ट्रीटमेंट घेण्याऐवजी आपण व्हिटामिन ई कॅप्सूलचा वापर करून पाहू शकता.

चेहऱ्यावर व्हिटामिन ई कॅप्सूल लावण्याचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन ई कॅप्सूल हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. हे त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून, त्वचेचे रक्षण करते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेला पोषण देते. आपल्या ब्यूटी रुटीनमध्ये व्हिटामिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा हे पाहूयात(How To Use Vitamin E Capsules For Face Health).

व्हिटॅमिन ई कॅप्सूल - एलोवेरा जेल

आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून लावू शकता. यासाठी एका वाटीत व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल घ्या त्यात एलोवेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि लिंबाचा रस

चेहऱ्यावर लिंबाचा रस लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे स्किन क्लियर होते. यासाठी एका वाटीत व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घ्या, त्यात लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून एकदा लावू शकता.

वाढ खुंटली, केस प्रचंड गळतात? घरीच करा कलोंजी - मेथी दाण्यांचं हेअर ग्रोथ ऑईल, केस भरभर वाढतील

व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि खोबरेल तेल

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घ्या, त्यात खोबरेल तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. व हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी