Lokmat Sakhi >Beauty > यंग, ग्लोइंग स्किनसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, १ चूक पडेल महागात...

यंग, ग्लोइंग स्किनसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, १ चूक पडेल महागात...

How To Use Vitamin E Capsules For Face Health, Glowing Appearance & More ? : 'व्हिटॅमिन ई' कॅप्सूल ग्लोइंग, यंग स्किनसाठी ठरत आहे वरदान, पण ते लावण्यापूर्वी घ्या काही लहान गोष्टींची काळजी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 08:30 AM2023-10-04T08:30:00+5:302023-10-04T08:30:02+5:30

How To Use Vitamin E Capsules For Face Health, Glowing Appearance & More ? : 'व्हिटॅमिन ई' कॅप्सूल ग्लोइंग, यंग स्किनसाठी ठरत आहे वरदान, पण ते लावण्यापूर्वी घ्या काही लहान गोष्टींची काळजी....

HOW TO USE VITAMIN E CAPSULES FOR FACE HEALTH, | यंग, ग्लोइंग स्किनसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, १ चूक पडेल महागात...

यंग, ग्लोइंग स्किनसाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी, १ चूक पडेल महागात...

अनेकजण सुंदर त्वचा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतात. आपण सर्वजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रॉडक्ट्स वापरतो. पण जर आपल्याला   त्वचेची नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्यायची असेल, तर व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल (Vitamin E Capsules) वापरणे हे खूप चांगले मानले जाते. व्हिटॅमिन 'ई' हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे जो आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतो. हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे जीवनसत्व देखील आहे जे पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्याचा रंग सुधारतो. याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्याची चमक वाढू शकते आणि त्वचा तरूण राहण्यास मदत होते(How to apply vitamin E capsules on to the skin directly).

व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यात हेल्दी व ग्लोइंग स्किनसाठी लागणारे सगळे आवश्यक घटक असतात. जर आपण रात्री झोपताना  व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावत असाल तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. रात्री व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावल्याने आपल्या त्वचेसंबंधित अर्ध्याअधिक समस्या दूर होण्यास मदत मिळते. असे असले तरीही व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स वापरताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींची (Vitamin E capsules can do wonders for your skin, Know 1 simple way to use it) काळजी घ्यावी लागते. या लहान - सहान गोष्टींची योग्य ती खबरदारी घेतल्यास व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचे आपल्या त्वचेला संपूर्ण फायदे मिळतात(4 Tips how to Apply Vitamin E Capsule for Face Effectively).

 व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावताना नेमकी कोणत्या गोष्टी लक्षांत ठेवाव्यात ? 

१. चेहरा स्वच्छ धुवून घ्या :- जेव्हा आपण चेहऱ्यावर व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावाल तेव्हा त्वचा स्वच्छ असणे फार महत्वाचे असते. यासाठीच चेहेऱ्यावर व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल लावण्याआधीच चेहरा किमान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. चेहरा स्वच्छ धुतल्यामुळे, चेहऱ्यावरील मेकअप, घाण आणि तेल इत्यादी दूर करू शकाल.

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

२. योग्य त्या प्रमाणांत याचा वापर करावा :- व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स त्वचेसाठी नक्कीच खूप फायदेशीर आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स लावावे. लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स लावल्याने त्वचा चिकट आणि तेलकट दिसू शकते. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स त्वचेवर अगदी कमी प्रमाणात लावा आणि हलक्या हातांनी वरच्या बाजूला मसाज करून लावा.

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

३. पॅच टेस्ट करावी :- व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलस त्वचेला अनेक फायदे देत असले तरी ते प्रत्येक प्रकारच्या त्वचेला सूट होईलच असे नाही. म्हणून, आपण सगळ्यात आधी आपल्या त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करणे फार महत्वाचे आहे. यामुळे त्वचेवर कोणतीही ऍलर्जी निर्माण होत आहे की नाही किंवा आपली त्वचा या   व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलससाठी संवेदनशील नाही  हे या पॅच टेस्टवरुन लक्षात येईल. 

टोमॅटो-कॉफी-मध साखर; सेलिब्रिटी योग ट्रेनर अंशुका परवानी सांगते खास फेसस्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो...

४. रात्री झोपताना चेहेऱ्याला लावा :- व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स सकाळी किंवा रात्री कधीही लावता येते. परंतु रात्रीच्या वेळी ते लावणे खूप चांगले मानले जाते. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स रात्री लावल्याने त्वचेवर खूप कमी वेळात चांगले परिणाम दिसून येतात. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स रात्री चेहेऱ्यावर लावल्यानंतर रात्रभर ते तसेच राहू द्यावे. जर तुम्हाला ते दिवसा लावायचे असेल तर सनस्क्रीन किंवा मेकअप लावण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी ते लावावे. जर आपल्या त्वचेवर व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलचा परिणाम खरोखरच पाहायचा असेल, तर याचा रोज न चुकता वापर करा. रोज झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स  त्वचेवर लावल्यास काही काळानंतर त्याचा परिणाम दिसून येतो.

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

Web Title: HOW TO USE VITAMIN E CAPSULES FOR FACE HEALTH,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.