सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाइफस्टाइलमुळे आपल्याला त्वचेची योग्य ती काळजी घेता येत नाही. त्वचेची वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम दिसू लागतात. अशी त्वचा कालांतराने खराब होऊन त्वचेसंबंधित अनेक समस्या वरचेवर सुरु होतात. आपली त्वचा डागविरहित, तजेलदार, चमकदार, नितळ असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु त्वचेची योग्य ती काळजी न घेतल्यास आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुरुम येणे, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे यांसारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्वचेच्या या अनेक समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या ब्यूटी केअर रुटीनवर लक्ष देण्यास सुरुवात करतो( Try These Amazing Wheat Flour Face Packs For Glowing Skin).
त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी आपण चंदन, मुलतानी माती यांसारख्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या पावडरचा वापर करतो. यासोबतच आपल्या किचनमध्ये असणाऱ्या गव्हाच्या पिठाचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास ते त्वचेसाठी लाभदायक ठरु शकते. गव्हाचे पीठ जेवढे शरीरासाठी फायदेशीर असते तितकेच त्वचेची काळजी (1 Best Way To Use Aata (Wheat Flour) As A Face Pack For Gorgeous Skin) घेण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. त्वचेसाठी गव्हाच्या पिठाचा फेसपॅक फारच उपयुक्त ठरतो. त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याची ताकद गव्हाच्या पिठात असते. चपात्या करण्यासाठी गव्हाचं पीठ हे घरात असतंच, त्यामुळे हा लेप बनवण्यासाठी फारसं साहित्य लागत नाही त्याचबरोबर खूप पैसेही खर्च करावे लागत नाहीत. हा फेसपॅक तयार करण्याची सोपी कृती पाहुयात(Apply These Atta Facepacks For Clear and Glowing Skin).
गव्हाच्या पिठाचा फेसपॅक....
१. साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ टेबलस्पून
२. गुलाबपाणी - ४ टेबलस्पून
३. मध - १ टेबलस्पून
४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
त्वचेच्या समस्या अनेक, कोरफड जेलमध्ये मिक्स करा हे ४ पदार्थ, स्किन प्रॉब्लेम्स होतील दूर...
२. कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार गुलाबपाणी मिक्स करुन पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी.
२. आता या पेस्टमध्ये मध घालून त्याची पातळसर पेस्ट बनवून घ्यावी.
३. जर आपल्याला ही पेस्ट खूपच घट्टसर झाल्यासारखी वाटत असेल तर आपण ती पातळ करण्यासाठी त्यात गुलाबपाणी घालू शकतो.
४. ही पेस्ट एखाद्या गोड पदार्थाचा पाक असतो तशी दिसेल.
३. फेसपॅक कसा वापरावा ?
१. हा फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी त्वचेला एलोवेरा जेल लावून ५ मिनिटे हलक्या हातांनी मसाज करुन घ्यावा.
२. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
३. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून घ्यावा. त्यानंतर किमान १० मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच लावून ठेवावा.
४. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
५. आठवड्यातून किमान २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून घ्यावा.
जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर..
४. त्वचेच्या कोणत्या समस्यांसाठी आहे जास्त फायदेशीर ?
हा गव्हाच्या पिठाचा फेसपॅक त्वचेवर लावल्याने त्वचेमधील अतिरिक्त तेल आणि डाग कमी करण्यास मदत करते. तसेच मुरुम, पिगमेंटेशन, वाढत्या एजिंगच्या खुणा, डेड स्किन, टॅनिंग आणि चेहऱ्याचा निस्तेजपणा कमी होण्यास मदत होते.