Lokmat Sakhi >Beauty > बदाम भिजवून खाता पण सालं फेकून देता? केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी करा बदामाच्या सालांचा खास उपयोग

बदाम भिजवून खाता पण सालं फेकून देता? केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी करा बदामाच्या सालांचा खास उपयोग

बदामाच्या सालांमध्ये ( nutrients in almond peels) जीवनसत्व, खनिजं आणि ॲण्टि ऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी, दातांची निगा राखण्यासाठी बदामाच्या सालांचा (benefits of almond peel) चांगला उपयोग होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 02:01 PM2022-09-06T14:01:37+5:302022-09-06T14:09:45+5:30

बदामाच्या सालांमध्ये ( nutrients in almond peels) जीवनसत्व, खनिजं आणि ॲण्टि ऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी, दातांची निगा राखण्यासाठी बदामाच्या सालांचा (benefits of almond peel) चांगला उपयोग होतो.

How to useful almond peels for solving skin and hair problem | बदाम भिजवून खाता पण सालं फेकून देता? केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी करा बदामाच्या सालांचा खास उपयोग

बदाम भिजवून खाता पण सालं फेकून देता? केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी करा बदामाच्या सालांचा खास उपयोग

Highlightsकेस मजबूत करण्यासाठी बदामाची सालं वापरता येतात. त्वचेच्या समस्यांवर त्वरित आणि परिणामकारक उपाय करण्यासाठी बदामाची सालं वापरावीत.दातांचा समस्यांवरही बदामाच्या सालांचा उपयोग होतो. 

मेंदुसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी बदाम (health benefits of eating almond)  तसेच खाण्यापेक्षा बदाम भिजवून खाणं जास्त फायदेशीर असतं. पण भिजवलेले बदाम सोलून (soaked almond benefits)  खाताना बदामाची सालं (almond peel)  मात्र निरुपयोगी म्हणून फेकून दिली जातात.  पण त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी, दातांसाठी बदामाच्या सालांचा चांगला उपयोग(almond peel benefits to skin and hair)   होतो. बदामाच्या सालांमध्ये जीवनसत्व, खनिजं आणि ॲण्टि ऑक्सिडण्टस हे महत्वाचे घटक असतात. हे घटक केसांची आणि त्वचेची काळजी घेताना महत्वाचे असतात. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात  आरोग्यासाठी, पोषणासाठी बदाम अवश्य भिजवून खावेत. मात्र  सोलताना सालं कचरा पेटीत टाकू नये. बदामाची सालं (how to use almond peel for beauty problems)  सौंदर्य समस्या सोडवण्यास फायदेशीर असतात. 

Image: Google

बदामाच्या सालांचा असा करावा वापर

1.  शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बदाम खाणं फायदेशीर असतं तर त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी बदामाची सालं उपयुक्त असतात. बदामाच्या सालांमध्ये ई जीवनसत्वं मोठ्या प्रमाणात असतं. केस मजबूत करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी जे हेअर पॅक लावले जातात, त्या लेपात बदामाची सालं मिक्सरमध्ये वाटून टाकावी. बदामाच्या सालांनी युक्त असा लेप केसांना लावल्यास केस मजबूत होतात. 

2. बदामाच्या सालात ॲण्टिऑक्सिडण्ट्स आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचेशी निगडित मुरुम, पुटकुळ्या येणं, चेहेऱ्यावर सुरकुत्या पडण्ं या समयांवर बदामाच्या सालांचा चांगला परिणाम होतो. बदामाची सालं मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. आणि हे वाटणं चेहेऱ्यासाठीच्या आपल्या आवडत्या लेपात मिसळून लावल्यास सौंदर्य समस्या सुटण्यास मदत होते.

3. आयुर्वेदानुसार दातांच्या समस्या सोडवण्यासाठी बदाम आणि त्याची सालं फायदेशीर असतात. दातांच्या समस्या असतील तर बदामाची सालं जाळून त्याची राख दातांना नियमित लावल्यास दातांच्या समस्या लवकर सुटण्यास मदत होते. 

4. केसात कोंडा झालेला असल्यास, उवा लिखांची समस्या असल्यास त्या घालवण्यासाठी  बदामाच्या सालांचा उपयोग करावा. कोणत्याही हेअर पॅकमध्ये बदामाची सालं वाटून मिसळून तो हेअर पॅक लावल्यास फायदा होतो. थोडे बदाम सालांसहित वाटून ते केसांना लावल्यास कोंडा, खाज, उवा-लिखा या समस्या लवकर दूर होतात. 

5. त्वचेच्या समस्यांवर त्वरित आणि योग्य उपचार न केल्यास समस्या वाढतात. त्वचेची संबंधित कोणतीही समस्या असल्यास बदामाची सालं वाटून ती एखाद्या लेपात मिसळू लावल्यास लगेच आराम मिळतो. चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतीला तर बदाम भिजवून ते सालांसह वाटून हा लेप चेहेऱ्यास लावल्यास सौंदर्य समस्या दूर होतात. 
 

Web Title: How to useful almond peels for solving skin and hair problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.