Lokmat Sakhi >Beauty > धुतल्यानंतरही चेहऱ्यावर तेज नसतं? शहनाज सांगतात चेहरा धुण्याची योग्य पद्धत; ग्लोईंग दिसेल त्वचा

धुतल्यानंतरही चेहऱ्यावर तेज नसतं? शहनाज सांगतात चेहरा धुण्याची योग्य पद्धत; ग्लोईंग दिसेल त्वचा

How to Wash Your Face Properly Tips : मेकअप करण्याची सवय असेल तर दिवसातून दोन वेळा आपला चेहरा स्वच्छ धुवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 07:50 PM2024-08-01T19:50:19+5:302024-08-01T19:51:23+5:30

How to Wash Your Face Properly Tips : मेकअप करण्याची सवय असेल तर दिवसातून दोन वेळा आपला चेहरा स्वच्छ धुवा.

How to Wash Your Face Properly Tips For Glowing Skin How To Wash Face The Right Way | धुतल्यानंतरही चेहऱ्यावर तेज नसतं? शहनाज सांगतात चेहरा धुण्याची योग्य पद्धत; ग्लोईंग दिसेल त्वचा

धुतल्यानंतरही चेहऱ्यावर तेज नसतं? शहनाज सांगतात चेहरा धुण्याची योग्य पद्धत; ग्लोईंग दिसेल त्वचा

घाण, धूळ मातीमुळे त्वचेचं सौंदर्य कमी होते. चेहरा व्यसस्थित साफ होत नाही. यामुळे अनेक स्किन प्रोब्लेम उद्भवतात.  घाम आणि घाणीमुळे त्वचेचे पोर्स बंद होतात. (Skin Care Tips) चेहरा साफ करणंही तितकंच महत्वाचे असते. मेकअप करण्याची सवय असेल तर दिवसातून दोन वेळा आपला चेहरा स्वच्छ धुवा. आपल्या स्किन टाईप आणि टेक्सचरनुसार नाईट टाईम रूटीन गरजेचं आहे. चेहरा धुण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. (How to Wash Your Face Properly Tips For Glowing Skin)

चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती (Right Way To Wash Face)

रात्री झोपण्याच्या आधी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. मेकअप केला नसेल तरी दिवसभराच्या कामाने चेहऱ्यावर तेल जमा होऊ लागतं. म्हणून मेकअप काढून झोपणं गरजेचं आहे. आपला चेहरा सकाळी, संध्याकाळी कच्च्या दुधाने साफ करा.

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल

क्लिंजरचा वापर करा

आपली त्वचा फार सेंसिटिव्ह असते आणि हार्श साबणाचा आणि केमिकल्सयुक्त क्लिंजरचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडते.  त्वचेतील घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. त्यामुळे त्वचा चांगली राहते.

पाण्याच्या टेम्परेचरची काळजी घ्या

आपला चेहरा कोमट पाण्याने धुवायला. गरम पाण्याने कधीच चेहरा धुवून नये. गरम पाणी त्वचेतून नैसर्गित तेल शोषून घेतो आणि त्वचा कोरडी बनते. पाण्याने चेहरा आणि मान व्यवस्थित साफ करता येते.  यानंतर मऊ टॉवेलनं चेहरा सुकवून घ्या. त्वचेला रगडू नका. अन्यथा त्वचेवर जळजळ होऊ शकते.

एक्सफोलिएट करताना स्क्रब करा

चेहरा धुतल्याने काही होत नाही. आपल्या त्वचेचे डेड स्किन काढून टाकण्यासाठी त्वचा एक्सफोलिएट करावी लागते. शुगर स्क्रब बनवून त्वचेला हलकं ओलं करून घ्या आणि हलक्या हाताने एक्सफोलिएट करा. खूप जास्त स्क्रब करू नका. फक्त 1 ते 2 मिनिटं स्क्रब करा. आपल्या बोटांनी कमीत कमी १ ते २ मिनिटं हळूहळू मालिश करा.

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल

चेहऱ्याला टोनर लावा

चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याचं नैसर्गिक पीएच थोडा बदलेला असू शकतो. टोनर  लावल्याने हे संतुलन चांगले  ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेत तेलकटपणा आणि इंन्फेक्शन होत नाही. टोनर तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवते. सीरम आणि मॉईश्चरायजर  त्वचेत व्यवस्थित अब्जॉर्ब होते. गुलाब पाण्याचे टोनर बनवून तुम्ही याचा वापर करू शकता. 

चेहऱ्याला मॉईश्चरायजर आणि सनस्क्रीन लावा

टोनर लावण्यासाठी काही सेकंदानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायजर लावा. मॉईश्चरायल लावल्याने चेहरा पूर्ण दिवस हायड्रेट राहील. यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका. चेहऱ्याला आणि मानेला ब्रॉड स्पॅक्ट्रम सनस्क्रीन लावायला  हवी. 

Web Title: How to Wash Your Face Properly Tips For Glowing Skin How To Wash Face The Right Way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.