चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण प्रत्येक जण साबण किंवा फेस वॉशचा वापर करतो. बरेच जण चेहऱ्यावर साबण वापरणे टाळतात. फक्त फेस वॉशने चेहरा क्लिन करतात. मात्र, अनेकदा घरातील फेस वॉश संपतो. अशा वेळी चेहरा कशाने धुवावा असा प्रश्न पडतो. साबण आणि फेस वॉशमध्ये केमिकल रसायने असतात. ज्यामुळे स्किनला हानी पोहचते.
शिवाय, चेहरा डल, व त्यावर मुरुमांची समस्या निर्माण होते. जर स्किन घरगुती उपायांनी क्लिन करायची असेल तर, ५ घरगुती वस्तूंचा वापर करून चेहरा क्लिन करा. या ५ वस्तूंमुळे चेहरा तर स्वच्छ होईलच, शिवाय मुरुमांचे डाग, चेहऱ्यावरील धूळ, मातीचे कण, डेड स्किन क्लिन होईल(How to wash your face without soap and face wash).
दूध
कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्यावर क्लिंझर म्हणून केले जाते. यामुळे चेहरा क्लिन होतो, यासह स्किनवर नैसर्गिक ग्लो येतो. यासाठी एका वाटीत दूध घ्या, त्यात कापूस बुडवून दूध चेहऱ्यावर लावा. दुधाचा कापूस चेहऱ्यावर चोळल्याने त्वचेतील घाण आणि डेड स्किन निघून जाईल. यानंतर पाण्याने चेहरा क्लिन करा.
केस प्रचंड गळतात? पांढरेही झालेत? शाम्पूनंतर लावा फक्त चहापत्तीचे पाणी, मग बघा कमाल
मध
चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक जण मधाचा देखील वापर करतात. मधामुळे चेहऱ्यावर चमक येते. सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्यानंतर चेहऱ्यावर एक चमचा मध लावून हलक्या हाताने चोळा. नंतर पाण्याने पुन्हा चेहरा धुवा. मधामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल.
दही
दुधाप्रमाणे दही देखील स्किनसाठी फायदेशीर मानले जाते. चेहऱ्यावर ओलावा राखण्यासाठी दही लावण्यात येते. परंतु, रोज चेहऱ्यावर दही लावणे टाळा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच चेहरा दह्याने स्वच्छ करा.
डार्क सर्कलमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाले? एक चमचा कॉफीचा भन्नाट उपाय, काही दिवसात दिसेल फरक
बेसन
बेसनाचा वापर आपण फेसपॅक म्हणून करू शकता. बेसनामुळे चेहरा क्लिन होतो. यासाठी एका वाटीत बेसन घ्या, त्यात हळद आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. त्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर बेसनाचा फेसपॅक लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.