Lokmat Sakhi >Beauty > साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल

साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल

How to wash your face without soap : एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो. यातील गुणधर्म त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:08 AM2023-10-17T09:08:00+5:302023-10-17T09:10:01+5:30

How to wash your face without soap : एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो. यातील गुणधर्म त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. 

How to wash your face without soap : Natural Ways To Wash Your Face Without Facewash or soap | साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल

साबण-फेसवॉश लावूनही चेहरा काळा, तेलकट होतो? या ७ वस्तूंनी चेहरा धुवा; नॅच्युरल ग्लो येईल

शरीराच्या सगळ्या अवयवांपैकी चेहऱ्याची काळजी सगळ्यात जास्त घेतली जाते. साबण किंवा फेसवॉशने चेहरा धुणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. चेहऱ्याला निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Natural Ways To Wash Your Face Without Soap) साबण किंवा फेशवॉश वापरून नेहमीच चेहरा धुतला जातो.  चेहरा धुण्यासाठी तुम्ही जितक्या नैसर्गिक वस्तूंचा वापर कराल तितकाच चेहरा सुंदर आणि ग्लोईंग दिसेल आणि आरश्यासारखा चमकेल. (How to wash your face without soap and face wash)

१) ओटमील एक नॅच्युरल स्क्रब आहे. ज्यामुळे चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स निघून जातात. ओटमील क्लासिक क्लिंजर आहे. ज्यामुळे त्वचेवरची घाण निघून चेहरा चमकदार दिसतो. 

२) मध एक नॅच्युरल मॉईश्चरायजर आहे ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यात जीवाणूरोधी गुण असता. ज्यामुळे काळे डाग आणि पुळ्या येत नाहीत.  याशिवाय स्किन सुंदर, चमकदार दिसते. 

विकतसारखं जाळीदार, मऊ अप्पम घरीच करा; 7 सोप्या ट्रिक्स-केरळस्टाईल परफेक्ट अप्पम बनेल

३) दूधातील प्रोटीन्स आणि फॅट्स त्वचेला मॉईश्चराईज करतात. स्किम्ड दूधाचा वापर चुकूनही करू नका. तुम्ही फूल फॅट दूधाचे सेवन करू शकता. दूध आपल्या हातावर घेऊन मग दुधाने त्वचेवर मसाज करा.

४) चेहऱ्यावर काकडीचा रस लावल्याने चमकदारपणा येतो. यातील मॉईश्चरायजिंग गुण त्वचेला मऊ-मुलायम बनवतात. काकडीचा थंड प्रभाव तुमची त्वचा सेंसिटिव्ह आणि ड्राय स्किनला चमकदार बनवतो.

५) एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो. यातील गुणधर्म त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. 

६) तेलकट त्वचेसाठी मुल्तानी माती एक उत्तम उपाय आहे. आधीच्या काळात लोक  चेहरा आणि केस धुण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करत असतं. मुल्तानी माती चेहऱ्याला लावून पाण्याने स्वच्छ धुवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. मुल्तानी माती लावल्यानंतर चेहरा जर जास्त कोरडा पडल्यासारखा वाटत असेल तर एलोवेरा जेल लावून घ्या. यामुळे तुमची त्वचा मॉईश्चराईज राहणार नाही तर रंगसुद्धा उजळेल.

केस गळतात-विंचरताना घरभर पसरतात? शेवग्याच्या पानांचा १ उपाय-महिन्याभारत वाढतील केस

७) जर तुमच्या चेहऱ्यावर दाणे किंवा अन्य त्वचेच्या समस्या असतील तर तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. अंघोळीच्या आधी बेसनाचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. बेसन तुम्ही केसांसाठीही वापरू शकता. बेसनामुळे डेड स्किन  निघण्याव्यतिरिक्त चेहऱ्याच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते. 

Web Title: How to wash your face without soap : Natural Ways To Wash Your Face Without Facewash or soap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.