दिवसातून २ ते ३ वेळा केस विंचरावेत आणि आठवड्यातून २ वेळा केस धुवायचे असं रूटीन बऱ्याच मुली फॉलो करतात. पण हेच रूटीन कधी कधी त्रासदायक वाटू लागतं. कारण केस धुताना आणि विंचरताना फार तुटतात. मेहनतीनं वाढवलेले केस गळताना पाहून खूपच त्रास होतो. (How To Shampoo and Condition Hair ) केसांचं गळणं कमी करण्यासाठी विविध प्रकारचे तेलं, शॅम्पू उपलब्ध आहेत. (5 Ways to Shampoo Your Hair)
केसांचा प्रकार वेगवेगळा असल्यानं कोणतं उत्पादनं कोणत्या प्रकारच्या केसांवर सुट होईल याचा अंदाज येत नाही. आजकाल ताण-तणावाचं प्रमाणही वाढलंय. अतिरिक्त ताण केस गळण्याचं कारण ठरत आहे. अशा स्थितीत केस धुताना काही गोष्टींची काळजी घेतली तर केस गळणं थांबवून केसांची वाढ चांगली होईल. (How to Wash Your Hair)
१) केस धुण्याआधी शॅम्पूमध्ये तांदळाचं पाणी, तेल आणि मध मिसळा. हे मिश्रण एकत्र करून केसांच्या मुळांना लावा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केस धुताना गळणारही नाहीत.
२) केसांना सगळ्यात आधी ओले करून घ्या. गरजेनुसार शॅम्पू हातात घेऊन त्यात १ चमचा साखरा मिसळा आणि दोन्ही मिक्स करून केसांना लावा आणि हळूहळू केसांची मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. शॅम्पू आणि साखर जर व्यवस्थित मिक्स झाली असेल तर केस स्वच्छ धुवायला जास्त वेळ लागणार नाही.
३) मुलतानी माती नैसर्गिक औषधीय गुणधर्मांमुळे ओळखली जाते. याचा उपयोग जुन्या काळात केस धुण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी केला जायचा. मुल्तानी माती केसांना लावल्यानं केसांची चमक वाढते आणि स्काल्प ऑयली होण्यापासून रोखता येतो. शॅम्पूमध्ये मुलतानी माती मिसळून केसांना लावा आणि केस स्वच्छ धुवा.
४) १ किंवा २ चमचे मुलतानी माती, एक चमचा मध, १/४ कप दही मिसळून ही पेस्ट केसांना लावा आणि स्काल्पला लावा जवळपास १५ मिनिटांपर्यंत केसांना तसेच लावलेले राहू द्या. नंतर पाण्यानं केस स्वच्छ धुवा.
५) बेसन सर्वांच्याच स्वयंपाकघरात उपलब्ध असते. केस धुण्यासाठी बेसनाचा वापर पुर्वापार केला जात आहे. यात प्रोटीन असते. ते केसांच्या वाढीसाठी मदत करते आणि केसांतील घाणंही दूर होते.