Lokmat Sakhi >Beauty > How to white hair turn black naturally : केस फार पांढरे झालेत? काळेभोर केसांसाठी वापरा हे खास तेल; आयुष्यभर काळे राहतील केस

How to white hair turn black naturally : केस फार पांढरे झालेत? काळेभोर केसांसाठी वापरा हे खास तेल; आयुष्यभर काळे राहतील केस

How to white hair turn black naturally : पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी  दोडक्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. विशेष म्हणजे ते केसांमध्ये लवकर प्रतिक्रिया देते. केस पांढरे होणं रोखण्यासोबतच ते मजबूत बनवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:52 AM2022-03-03T11:52:20+5:302022-03-03T14:41:17+5:30

How to white hair turn black naturally : पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी  दोडक्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. विशेष म्हणजे ते केसांमध्ये लवकर प्रतिक्रिया देते. केस पांढरे होणं रोखण्यासोबतच ते मजबूत बनवते.

How to white hair turn black naturally : Homemade ridge gourd oil and hair pack for grey hair know how to make it | How to white hair turn black naturally : केस फार पांढरे झालेत? काळेभोर केसांसाठी वापरा हे खास तेल; आयुष्यभर काळे राहतील केस

How to white hair turn black naturally : केस फार पांढरे झालेत? काळेभोर केसांसाठी वापरा हे खास तेल; आयुष्यभर काळे राहतील केस

जेव्हा अकाली केस पांढरे होऊ लागतात (White hairs solution) तेव्हा समजले पाहिजे की तुम्हाला तुमची दिनचर्या बदलावी लागेल. आपण निरोगी जीवनशैली आणि आहाराद्वारे याला प्रतिबंध करू शकतो, परंतु आपण जर काही हर्बल पद्धती वापरल्या तर पांढरे केस देखील पुन्हा काळे होऊ शकतात. सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे समस्या वाढतच जाते. अशा अनेक गोष्टी आहेत. (Hair Care Tips) ज्याचा वापर करून केस पांढरे होण्यापासून रोखता येऊ शकतं. आयुर्वेदात, या घटकांचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पोट स्वच्छ ठेवण्यासोबतच अनेक शारीरिक समस्यांपासून बचाव होतो. (Black Hairs Home remedies)

पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी  दोडक्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. विशेष म्हणजे ते केसांमध्ये लवकर प्रतिक्रिया देते. केस पांढरे होणं रोखण्यासोबतच ते मजबूत बनवते. (How to get black hairs using home remedies) दोडक्याची भाजी खाण्यासाठी अनेकजण नाकं मुरडतात. पण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. (gourd oil for hair)

केस गळून गळून खूप पातळ झालेत, वाढही होत नाहीये? दाट केसांसाठी शहनाझ हुसैननं सांगितले सोपे उपाय 

पोट स्वच्छ ठेवण्यासोबतच अनेक शारीरिक समस्यांपासून बचाव होतो. पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी दोडक्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. विशेष म्हणजे याची केसांमध्ये लवकर प्रतिक्रिया दिसून येते. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासोबतच ते केस मजबूत बनवते. 

हे तेल केस काळे तर करेलच पण त्यांना पोषण देण्याचंही काम करेल. हेअर पॅक बनवण्यासाठी दोडक्याचा लगदा काढा. यासाठी लुफा घेऊन त्याची साल काढावी व बारीक चिरून घ्यावी. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या आणि नंतर चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. यासाठी जाडसर चाळणी वापरा.

आवळा पावडर - 1 टीस्पून

भृंगराज पावडर - 1 टीस्पून

दोडक्याचा पल्प - 2 टीस्पून

जास्वंद पावडर - 1 टीस्पून

दही - आवश्यकतेनुसार

सर्व साहित्य एकत्र मिक्स करू नका. पेस्ट बनवण्यासाठी गरज भासल्यास दही वापरा आणि नंतर केसांना लावा.  किमान ४५ मिनिटे किंवा १ तास असेच राहू द्या. हे तेल बनवण्यासाठी प्रथम दोडकी कापून वाळवा. आता सर्व एका प्लेटमध्ये ठेवा आणि मेथी दाणे, काळ्या बिया, 4 ते 5 लवंगा आणि कांद्याच्या बीयाही सोबत ठेवा. गॅसवर तवा ठेवा आणि गरम होऊ द्या. तवा गरम होताच खोबरेल तेल घाला. आता त्यात सर्व साहित्य मिसळा आणि उकळ येऊ द्या. तेलाला उकळ येताच थंड होण्यासाठी ठेवा. आता स्वच्छ बरणीत गाळून ठेवा.

रिसर्च-निरोगी दीर्घायुष्यासाठी रोजच्या जेवणातून फक्त हे पदार्थ वगळा; वाढत्या वयातही आजारांपासून लांब राहाल

आठवड्यातून किमान दोनदा तेल लावा. हे तेल टाळूला लावल्यानंतर त्याची चांगली मसाज करा. याशिवाय आठवड्यातून दोनदा हेअर पॅक लावा. शॅम्पू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांनी हे करून पहा. त्याच वेळी, हेअर पॅक लावल्यानंतर, फक्त केस स्वच्छ धुवा. शॅम्पू दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसांनीही करता येतो. या तेलानं पांढऱ्या केसांपासून सुटका होण्यासोबतच केसांच्या इतर समस्यांपासूनही सुटका मिळेल.

 साडीत उंच, स्लिम दिसण्यासाठी ६ ट्रिक्स; चारचौघात उठून दिसेल परफेक्ट साडी लूक

कोंडा, पातळ केस इत्यादी समस्या याच्या मदतीने सोडवता येतात. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि मॅग्नेशियम केसांना पोषण देण्यासोबतच समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. जर तुम्हाला केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही हेअर केअर रुटीनमध्ये याचा समावेश करू शकता.
 

Web Title: How to white hair turn black naturally : Homemade ridge gourd oil and hair pack for grey hair know how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.