आपले दात पांढरेशुभ्र व्यवस्थित असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. बोलताना, हसताना अनेकांचे दात चांगले दिसत नाहीत. रोजच्या खाण्यापिण्याच्या आणि स्वच्छतेच्या सवयींचा दातांच्या रंगावर परिणाम होत असतो. (Teeth Care Tips) तुमचे दात पिवळे झाले असतील आणि त्यामध्ये जंत असतील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या दातांची चिंता सतावत असेल. काही घरगुती उपाय वापरून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (How to whiten teeth naturally at home)
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय
१) कॅल्शियम तुमच्या दातांसाठी खूप महत्वाचे आहे. दात पिवळे पडणे हे काहीवेळा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असू शकते. अशा स्थितीत तुम्ही कितीही उपाय केले, तरी तुमचे दात पांढरे होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आहारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असलेले पदार्थांचा समावेश करा.
२) याशिवाय एक चमचा खोबरेल तेल 15 ते 20 मिनिटे तोंडात ठेवा. त्यानंतर ब्रश करा. काही दिवसातच दात मोत्यांसारखे चमकू लागतील.
३) पिवळे दात पांढरे करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील हिंग वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हिंग पावडर पाण्यात उकळून थंड होऊ द्यावी लागेल. मग त्या पाण्यानं गुळण्या करा.
४) बेकिंग सोडा देखील दातांचा पिवळेपणा दूर करू शकतो. तुम्ही बेकिंग सोडा दातांवर लावू शकता किंवा टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मीठही घालू शकता. पिवळे दात पांढरे करण्याचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.
५) पांढरे आणि चमकदार दात मिळविण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलासह मीठाऐवजी हळद देखील वापरू शकता. यासाठी 1 चमचे मोहरीच्या तेलात अर्धा चमचा हळद मिसळून ही पेस्ट बोटांच्या मदतीने दातांवर हलक्या हाताने चोळा. या मिश्रणाचा नियमित वापर करा आणि काही दिवसात दातांचा पिवळेपणा पूर्णपणे दूर होईल.
६) दात पांढरे करण्यासाठी तुम्ही केळीची साल देखील वापरू शकता. केळी हे जितके फायदेशीर फळ आहे, तितकेच त्याचे साल देखील फायदेशीर आहे. केळीच्या सालीचा पांढरा भाग दातांवर 1 किंवा 2 मिनिटे साल रोज घासून नंतर ब्रश करा. केळीमध्ये असलेले पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे दातांना चांगले ठेवतात. यामुळे दात पांढरे तर होतातच पण ते मजबूतही होतात.
कारणं
अशी अनेक कारणे आहेत ज्यांमुळे दातांचा पांढरेपणा जाऊन दातांमध्ये पिवळेपणा येतो. खाण्यापिण्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यामुळे दातांवरील इनॅमल दूषित होऊन दात पिवळे दिसू लागतात. याशिवाय दातावर प्लाकचा थर जमा झाला तर दातही पिवळे दिसू लागतात. चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन केल्याने किंवा जे लोक दात व्यवस्थित साफ करत नाहीत त्यांनाही दातांसंबंधी समस्या अधिक होतात.