आजकाल लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच केस पांढरे होत चालले आहेत (White Hairs). केस पांढरे झाल्यामुळे अनेकजण हेअर कलर ट्राय करतात. तर काही केसांना डाय करतात (Hair care). किंवा मेहेंदी लावतात. पण त्यातल्या केमिकल्समुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. केस गळतात, पांढरे होतात बहुतांश वेळा स्काल्प देखील खराब होते.
केस काळे करणाऱ्या उत्पादनांमध्ये अनेक केमिकलयुक्त घटक असतात. ज्यामुळे केस डॅमेज होतात. पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करण्यासाठी आपण हळदीचा देखील वापर करू शकता. केसांना काळे करण्यासाठी हळद लाभदायक ठरते. पण हळदीचा वापर केसांसाठी नेमका कसा करावा? पाहूयात(How Turmeric Solves Your Hair Issues; Know Ways to Use it).
केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी हळदीचा सोपा उपाय
लागणारं साहित्य
मोहरीचे तेल
केसांची वाढ खुंटली? फक्त खोबरेल तेल कशाला? त्यात मिसळा ३ गोष्टी; महिनाभरात दिसेल रिझल्ट
हळद
कॉफी
व्हिटॅमिन ई कॅप्स्युल
या पद्धतीने तयार करा होममेड डाय
सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप मोहरीचे तेल घाला. नंतर त्यात २ चमचे हळद आणि दीड चमचे कॉफी पावडर घालून मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा आणि एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक व्हिटॅमिन ई कॅप्स्युल आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे होममेड डाय रेडी.
मान काळवंडली- घासूनही निघत नाही? टूथपेस्टचा सोपा उपाय - मान होईल स्वच्छ टॅनिंग गायब
तयार डायमध्ये ब्रश बुडवून केसांना लावा. काही वेळानंतर केस पाण्याने धुवा. या होममेड डायमुळे केसांना नक्कीच फायदा होईल. केसांची वाढही होईल.