Join us  

साडी नेसून काम भरभर करता येत नाही? 'अशी' चापूनचोपून नेसा साडी, सोयीचं आणि सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 1:24 PM

How to wear comfortable saree : साडी तर नेसावी वाटते, पण साडी नेसली की कामेच सुचत नाहीत, खूपच अवघडून जातं.. असं तुमचंही होतं का? मग हे बघा चापून चोपून अगदी आरामदायी पद्धतीने साडी नेसण्याचं सिक्रेट (feel easy and comfortable in saree)...

ठळक मुद्दे'अशी' चापूनचोपून साडी नेसा, कामं जमतील फटाफट!

साडी.... हा बहुसंख्य मैत्रिणींचा अगदी आवडीचा विषय (saree love)... एरवी जीन्स, सलवार कुर्ता यामध्येच आरामदायी वाटत असलं तरी प्रसंगानुसार साडी नेसण्याची इच्छा प्रत्येकीचीच होते... अगदी सणावाराला ऑफिसला देखील साडी नेसूनच जावं वाटतं. पण तरीही अनेक जणी साडी नेसण्याचं टाळतात. याचं एकच मुख्य कारण म्हणजे साडी नेसली की अजिबातच कर्म्फटेबल वाटत नाही. साडी नेसली की काही काम करणंच जमत नाही, अगदीच अवघडून गेल्यासारखं होतं... त्यामुळेच तर खूप इच्छा असूनही अख्खा दिवस ऑफिसमध्ये साडी नेसून बसणं अनेक जणींना अशक्य वाटतं...

 

मैत्रीणींनो साडी नेसून काम करणं ही खरोखरंच आपल्याला वाटते तेवढी अवघड गोष्ट नाही. अर्थातच आपल्याला जास्त सवयीचं असल्याने जीन्स आणि सलवार कुर्त्याचा आरामदायीपणा साडीत नाही. पण तरीही साडी नेसण्याची थोडी आणखी आरामदायी पद्धत जाणून घेतली तर नक्कीच साडीतही तुम्हाला फटाफट कामं उरकता येतील.. त्यासाठी बघा या काही सोप्या टिप्स.. 

 

साडी नेसण्याची योग्य पद्धत..Simple, easy and comfortable way to wear saree- साडी नेसताना सगळ्यात आधी समोरच्या बाजूने थोडी उजव्या साईडनेच साडी खोचण्यास सुरूवात करा.- साडीचा वरचा भाग पेटीकोटमध्ये व्यवस्थित खोचून घ्या. - यानंतर तुम्हाला पाहिजे त्या लांबीचा पदर काढा, डाव्या खांद्यावरून मागे टाका.- आता डाव्या बाजूला तुमच्या कंबरेजवळ साडीचा जो मागच्या बाजूने आलेला काठ असतो, तो काठ आणखी पुढे ओढा आणि पोटाजवळून तिरक्या दिशेने खाली ओढून म्हणजे जवळपास उजव्या मांडीजवळ साडीचा काठ पेटीकोटला पिनअप करून घ्या.- आता जिथे तुम्ही पिनअप केलं आहे, तो साडीचा काठ तसाच वर उचलून घ्या आणि वरच्या बाजूने पदरात खाेचून द्या.- आता जो काठ तुम्ही नुकताच खोचला आहे, तेथूनच साडीच्या निऱ्या घालायला सुरूवात करा. 

- थोडक्यात सांगायचे म्हणजे आता आपण डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे अशा दिशेने साडीच्या निऱ्या घालणार आहोत. - असे केल्यामुळे नंतर उजव्य बाजूला निऱ्यांची खूप ॲडजस्टमेंट करावी लागत नाही.- निऱ्या पेटीकोटमध्ये खोचल्या नंतर त्या देखील पिनअप करा.- एक पिन निऱ्या आणि पेटीकोट या दोघांना जोडणारी पण लावा.- यानंतर साडीचा पदर व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्या किंवा हातावर सोडा. डाव्या खांद्याजवळ पिनअप करा.- डाव्या बाजूने समोरून ब्लाऊजचा जो भाग आहे, त्या ठिकाणाहून साडीच्या पदराचा काठ जातो. तो काठही जरा वर ओढून ब्लाऊजला पिनअप करा. जेणेकरून साडीचा पदर अजिबात हलणार नाही.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशन