Join us  

थंडीत लग्नाला मस्त साडी नेसून जाता, पण थंडी वाजते म्हणून शाल-स्वेटर लागते? 'अशी' नेसा साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 1:14 PM

Warm look in saree : लग्नसराई (marriage season) आणि थंडीच थंडी... म्हणूनच तर लग्नाला जाताना अशा पद्धतीने नेसा साडी (ideas of wearing saree).... थंडीतला वार्म लूक !

ठळक मुद्दे खास थंडीत येणाऱ्या लग्नसराईसाठी थोडी वेगळी तयारी करा.थोडी स्टाईल बदलली, तर कुडकुडणाऱ्या थंडीपासून आपले संरक्षण होऊ शकते.

तुळशीचं लग्न लागलं की लग्नसराई सुरू होते. थंडीचा मौसम आणि शादी का मौसम दोन्ही सोबतच सुरू झाल्याने महिला वर्गाची मात्र चांगलीच पंचाईत होते. कारण लग्न समारंभाचे अनेक कार्यक्रम सायंकाळी, रात्री असतात. त्यामुळे मग कुडकुडणाऱ्या थंडीत कोणते कपडे घालायचे आणि कोणते टाळायचे, याची खूपच जुळवाजुळव करावी लागते. एकवेळ दिवसभर असणाऱ्या विधींच्या वेळीतरी मनासारखा मेकअप (make up) आणि ड्रेसिंग (dressing, saree draping style) करता येते. पण रात्रीच्या वेळी मात्र छान, मस्त तयार झालेलो असतानाही गारठून टाकणाऱ्या थंडीमुळे सारखी शाल ओढून घ्यावी लागते नाही तर मग स्वेटर (sweater) घालावे लागते. 

 

असं करणं म्हणजे भयंकरच बोअरिंग काम. म्हणूनच तर खास थंडीत येणाऱ्या लग्नसराईसाठी थोडी वेगळी तयारी करा. आता लग्नासारखे कार्यक्रम असले की बऱ्याच जणी साडी नेसण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच जरा हटके पद्धतीने साडी नेसली, (how to wear saree) पदर घेण्याची थोडी स्टाईल (saree draping style) बदलली, तर कुडकुडणाऱ्या थंडीपासून आपले संरक्षण होऊ शकते आणि मग शाल, स्वेटर असं काही घेण्याची गरजही पडत नाही. शिवाय थंडीतला आपला हा स्पेशल वार्म लूकही अतिशय स्टाईलिश आणि हटके (trendy look in saree) दिसतो. 

 

थंडीमध्ये अशी नेसा साडी१. जॅकेट आणि बेल्टJacket and belt with sareeसाडीवर जॅकेट हे वाचून जरा वेगळं वाटलं असेल, पण हा ट्रेण्ड सध्या खूपच इन आहे. तुम्ही जर एखाद्या लग्नात शिफॉन, सिल्क अशी साडी नेसणार असाल, तर त्या साडीवर तुम्ही एखादं एलिगंट लूक असणारं जॅकेट घालू शकता. जॅकेट थोडं ग्लॉसी आणि वर्क असणारं हवं. प्लेन असलं तरी शिमरिंग असावं. या जॅकेटवर बेल्ट लावा आणि साडीवर जॅकेट आणि बेल्ट घालून असा मस्त वार्म लूक कॅरी करा. 

 

२. स्लिव्हलेस स्वेटरsleveless sweater with sareeeहा देखील एक चांगला पर्याय आहे. असा लूक करायचा असेल तर तुमचं ब्लाऊज ज्या रंगाचं आहे, त्याच रंगाचं स्लिव्हलेस स्वेटर तुमच्याकडे हवं. ब्लाऊज घातल्यानंतर त्यावर स्लिव्हलेस स्वेटर घाला आणि त्यावरून पदर घेऊन पिनअप करा. यासाठी मात्र साडी आणि स्वेटर यांचे रंग एकमेकांशी मिळतेजुळते हवे.

 

३. स्वेटर आणि साडीsweater and sareee खूपच जास्त थंडी असेल तर तुम्ही या पर्यायाचाही विचार करू शकता. अशा पद्धतीने साडी नेसण्यासाठी तुमच्याकडे साडीशी कॉन्ट्रास्ट रंग असणारा स्वेटशर्ट हवा. स्वेटशर्ट घातल्यानंतर तुम्ही त्यावरून वेगवेगळ्या पद्धतीने साडीचा पदर घेऊ शकता. साडीचा पदर जेवढा हटके पद्धतीने घ्याल, तेवढा तुमचा लूक वेगवेगळा होऊ शकतो. अशा पद्धतीने साडी नेसण्यासाठी दागिन्यांची निवडही खूपच खास असावी लागते. साधारणपणे काठ पदराची साडी असल्यावर असा लूक मॅच होत नाही. डिझायनर, शिफॉन अशा पद्धतीची साडी नेसणार असाल, तर असा स्वेटशर्टचा विचार तुम्ही करू शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीफॅशन