त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स, लोशनचा वापर करतो. घराबाहेर पडताना आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम आवर्जून लावतोच. बाहेर उन्हात फिरताना, खास करुन उन्हाळ्याच्या ऋतूत घराबाहेर पडताना त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावणे महत्वाचे असते. ज्यावेळी आपण सूर्याच्या अति नील किरणांच्या संपर्कात येतो त्यावेळेला त्वचा खराब होते, काळवंडते, त्वचेला कोरडेपणा येतो. मुरुम, पुटकुळ्या होतात, त्वचेवर तेलाची अतिरिक्त तेल निर्मिती होवून त्वचा खराब होते. सनस्क्रीन लावल्यानं उन्हाच्या तीव्र झळांतही चेहऱ्याची त्वचा सुरक्षित राहाते. सूर्याचे अति नील किरणांचा धोका हा फक्त उन्हाळ्यातच असतो असं नाही तर एरवीही असतो. फक्त उन्हाळ्यात या धोक्याची तीव्रता वाढते इतकंच. त्यामुळे सौंदर्यतज्ज्ञ सनस्क्रीनला नेहमीच्या सौंदर्योपचाराचा महत्वाचा भाग मानतात(How & When To Apply Sunscreen On Face).
त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लोशन महत्वाचं हे खरंच. पण सनस्क्रीन लोशन किंवा क्रिम्स लावल्याने काहीजणींच्या त्वचेला याचा त्रास होतो. सनस्क्रीन सगळ्यांच्याच त्वचेला सूट होईलच असे नाही. काहीवेळा त्वचेला सनस्क्रीन लोशन लावल्याने त्याचे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्या त्वचेवर दिसून येतात. सनस्क्रीन क्रिम किंवा लोशन लावल्याने काहीजणींच्या त्वचेवर पुरळ, मुरुमं येऊ लागतात, त्वचा लालसर होते तर कधी त्वचेवर बारीक पुरळ येऊ लागतात. त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे संरक्षण होण्याऐवजी काहीवेळा त्वचेचे नुकसान होऊन त्वचा खराब होऊ लागते. कधी त्वचेचा पोत बिघडतो तर कधी पुरळ येऊ लागतात. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावावे की लावू नये ? असा प्रश्न पडतो. सनस्क्रीन लोशन लावण्याचीही विशेष पध्दत आहे, सनस्क्रीन लोशन चेहऱ्यास लावण्याचे काही नियम आहेत. ते पाळले नाहीत तर सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर काहीच परिणाम होत नाही. चुकीच्या पध्दतीनं सनस्क्रीन लावल्यानं चेहरा खराब होण्याचाच धोका असतो. जी बाब आपल्या त्वचेसाठी, त्वचेच्या काळजीसाठी अत्यावश्यक आहे ती वापरताना काय काळजी घेणं हे समजून घेणं म्हणूनच महत्वाचं आहे(How to apply sunscreen right way of sunscreen application how to control acne & pimple).
सनस्क्रीन क्रिम्स किंवा लोशन लावल्याने त्वचेवर पुरळ, मुरुमं का येतात ?
सनस्क्रीन क्रिम्स किंवा लोशन लावल्याने त्वचेवर पुरळ, मुरुमं येण्याची प्रमुख दोन कारणं आहेत. जर आपण आपली स्किन योग्यरीतीने स्वच्छ न करता सनस्क्रीन क्रिम्स किंवा लोशन त्वचेला लावले तर त्वचेवर पुरळ, मुरुमं येऊ शकतात. यासोबतच जर तुम्ही रात्रभर त्वचेला सनस्क्रीन क्रिम किंवा लोशन लावून झोपलात तर त्वचेवर पुरळ, मुरुमं येतात. यासाठीच झोपण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करावी.
नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...
श्रावण स्पेशल : फक्त तासभर लावा हातावर मेहेंदी, रंगेल लालचुटूक-रात्रभर न ठेवताही खुलेल रंग...
त्वचेला सनस्क्रीन लावताना लक्षात ठेवा...
१. सनस्क्रीन लावताना त्वचा स्वच्छ असणे गरजेचे असते. त्वचेला किंवा ज्या भागात सनस्क्रीन लावणार तो भाग स्वच्छ धुवून घ्यावा.
२. आधी त्वचेला मॉइश्चरायझर लावल्यानंतर मग सनस्क्रीन लोशन लावा. पण मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेचच सनस्क्रीन लोशन लावू नका. अर्धा मिनिट थांबून मगच सनस्क्रीन लोशन लावावे. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एका मागोमाग एक असे लावू नये. यामुळे ती त्वचेत नीट शोषली जात नाहीत.
शोभितासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर? पाहा तिचे सोपे सिक्रेट - एकदा लावा चेहऱ्यावर येईल चमक ...
३. सनस्क्रीन लोशन लावताना ते आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे निवडा. मॉइश्चरायझर त्वचेत शोषले गेल्यानंतर हातांवर सनस्क्रीन लोशन घ्यावे. सनस्क्रीन लोशन थेट त्वचेवर लावून रगडू नये. ते आधी हातावर चोळून घ्यावे आणि मग चेहऱ्यावर हळूवार लावावं. ते हळूवार लावल्याने लगेच त्वचेत शोषलं जात. सनस्क्रीन लोशन हळूवारपणे लावल्यानंतर चेहरा थोपावा, यामुळे सनस्क्रीन लोशन त्वचेत हळूवार शोषलं जात.
४. सनस्क्रीन लोशन लावल्यानंतर किमान १५ मिनिटानंतर घराबाहेर पडावं. सनस्क्रीन लोशन लावून लगेच घराबाहेर पडल्यास त्वचा तेलकट होते.