Lokmat Sakhi >Beauty > सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...

सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...

How You Can Get Rid Of A Puffy Face In The Morning : भाग्यश्रीचे 'आईस्क्रीम रुटीन' करा फॉलो, चेहेऱ्यावरचा पफीनेस होईल मिनिटांत दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 05:43 PM2023-04-05T17:43:53+5:302023-04-05T17:48:33+5:30

How You Can Get Rid Of A Puffy Face In The Morning : भाग्यश्रीचे 'आईस्क्रीम रुटीन' करा फॉलो, चेहेऱ्यावरचा पफीनेस होईल मिनिटांत दूर...

How You Can Get Rid Of A Puffy Face In The Morning | सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...

सकाळी उठल्या उठल्या चेहरा भप्प सुजलेला दिसतो? भाग्यश्री सांगते त्यावर उपाय...

बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपली स्किन खूप डल, निस्तेज किंवा काहीवेळा चेहेऱ्यावर सूज आलेली दिसते. आपली पुरेशी झोप झाली नाही किंवा स्ट्रेस यांसारख्या विविध कारणांमुळे सकाळी उठल्यावर आपल्या चेहऱ्याची स्किन हवी तशी फ्रेश दिसत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येऊन चेहऱ्यावर पफीनेस दिसायला लागतो. झोप पूर्ण न झाल्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर तर होतोच त्याचबरोबर हा परिणाम आपल्या चेहऱ्यावर चटकन दिसून येतो. 

काही जणांना सकाळी उठल्यानंतर डोळ्यांखाली पफीनेस अर्थात सूज जाणवते. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांमुळे पूर्ण चेहेराही खराब दिसतो. काही जणांना हा नेहमीचा त्रास असतो. डोळ्यांना आलेल्या पफीनेसमुळे चेहरा निस्तेज आणि आजारी असल्यासारखाही वाटतो. सकाळी उठल्यानंतर येणारी चेहेऱ्याची व डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदतही घेऊ शकता. पण सकाळी उठल्यानंतर डोळ्यांना व चेहऱ्याला येणारी सूज अर्थात पफीनेस घालवण्यासाठी नक्की काय करावे हे बऱ्याचजणांना माहित नसते. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री सांगते चेहऱ्यावरील पफीनेस दूर करण्यासाठीचे तिचे खास 'आईस्क्रीम रुटीन'(How You Can Get Rid Of A Puffy Face In The Morning).

काय आहे भाग्यश्रीचे 'आईस्क्रीम रुटीन'... 

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिने सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावरचा पफीनेस, डलनेस दूर करुन दिवसभर चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तिच्या आईस्क्रीम रुटीनबद्दलचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावर सकाळी उठल्यानंतर पफीनेस, डलनेस दिसतो. हा चेहऱ्यावरचा पफीनेस दूर करण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याला 'आइसिंग' करण्याचा सल्ला भाग्यश्री देते. चेहऱ्याला 'आइसिंग' करण्यासाठी काही बर्फाचे तुकडे घेऊन ते चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून घ्यावे. बर्फाच्या खड्याने सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर 'आइसिंग' केल्याने चेहऱ्यावरील पफीनेस व डलनेस कमी होण्यास मदत होते.

भाग्यश्री सांगते बर्फाचे खडे घेऊन हे बर्फाचे खडे चेहऱ्यावर हलक्या हाताने चेहेऱ्यावर ५ ते १० मिनिटे फिरवून घ्यावे. त्यानंतर चेहरा स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावा. चेहरा संपूर्ण कोरडा झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे चेहेऱ्यावर आलेला पफीनेस व डलनेस क्षणांत दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावरचा पफीनेस व डलनेस कमी करण्यासाठी भाग्यश्री 'आइस' आणि मॉइश्चरायजर 'क्रिम' यांचा वापर करण्यास सांगते व तिच्या या रुटीनला तिने 'आईस्क्रीम रुटीन' असे नाव दिले आहे.     


चेहेऱ्यावर 'आइसिंग' करण्याचे फायदे :-

१. चेहेऱ्यावरील त्वचेचे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते. 

२. एक्नेची समस्या दूर होते. 

३. डोळ्यांना आलेला थकवा आणि डोळ्यांखाली येणारी सूज नाहीशी करण्यास मदत करते. 

४. स्किन टाइटनिंग करण्यास उपयुक्त ठरते. 

उन्हाळ्यात सतत आइस वॉटर फेशियल करताय? थांबा, त्वचेवर होतील ५ गंभीर परिणाम, चेहरा सांभाळा...

५. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. 

६. चेहऱ्याच्या स्किनचा चमकदारपणा वाढतो. 

७. डार्क सर्कल्सची समस्या दूर होते. 

८. स्किनवरील काळे डाग घालविण्यास मदत होते.

Web Title: How You Can Get Rid Of A Puffy Face In The Morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.