Join us  

तिशीनंतर महिलांनी घ्यावी केसांची ‘अशी’ काळजी, नाहीतर केसांचा होतो झाडू-दिसतात बेजान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 10:01 AM

How you should take care of your hair in 30s : तिशीनंतर केसांची काळजी कशी घ्यावी?

आपल्या केसांची काळजी घेण्याचं काम आधी आई करायची. मग नंतर अनेक कारणांमुळे आपल्याकडून दुर्लक्ष होते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बघता-बघता दाठ केसांचा झाडू कधी होतो, हे कळूनच येत नाही. बऱ्याचदा वाढत्या वयामुळे देखील केसांच्या समस्या वाढत जातात. बऱ्याचदा किशोर वयात आपण अनेक चुका करतो.

केसांना कलर लावण्यापासून योग्य काळजी न घेण्यापर्यंत. या कारणामुळे हळूहळू केसांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते (Skin Care Tips). तिशीनंतर केसांची काळजी कशी घ्यावी? जीवनशैलीत कोणते बदल आणल्याने केसांचे आरोग्य सुधारेल? पाहूयात(How you should take care of your hair in 30s).

हेल्दी केसांसाठी डाएटमध्ये करा काही खास बदल

यासंदर्भात, लखनौस्थित आहारतज्ज्ञ श्रेया अग्रवाल सांगतात, 'तिशीनंतर महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आहारातील पोषक घटक केसांना नवीन जीवनदान देतात. निरोगी केसांसाठी महिलांनी त्यांच्या आहारात ड्रायफ्रुट्स, सीड्स, भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे.'

केमिकल डायमुळे केस गळतात? करून पाहा नारळाच्या शेंड्यांचा वापर; केसांवर चढेल नैसर्गिक रंग

त्या पुढे म्हणतात, 'या गोष्टींशिवाय महिलांनी त्यांच्या आहारात वाटाणा, राजमा, चणे आणि काजू यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा. या सर्व गोष्टींमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि आयरन आढळते. ज्यामुळे वाढत्या वयात केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो.'

मेडिटेशन करा

तिशीपर्यंत महिला कुटुंब आणि नौकरी या दोन्ही गोष्टी सांभाळतात. जबाबदाऱ्यांमुळे महिला थकतात शिवाय टेन्शन घेतात. तणाव आणि मानसिक दडपणाचा थेट परिणाम केसांवरही होतो. यापासून सुटका हवी असेल तर, मेडीटेशन करा. यामुळे ताण कमी होईल, शिवाय स्काल्पवरील ब्लड सर्क्युलेशन सुधारेल.

महागडे सिरम सोडा - रात्री झोपताना लावा ‘या’ २ पैकी १ तेल; चेहरा दिसेल कायम फ्रेश-चमकदार

केसांना तेल लावायला विसरू नका

तिशीनंतर महिलांचे केस खूप कोरडे होतात. केस कोरडे होऊ नये, म्हणून आठवड्यातून २ ते ३ वेळा तेल लावावे. तेल लावल्याने स्काल्पला पोषण मिळते. शिवाय केसांच्या अनेक समस्याही दूर होतील. तज्ज्ञांच्या मते, केसांना नियमित तेलाने मसाज केल्याने केस मऊ आणि जाड होतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स