Lokmat Sakhi >Beauty > बर्फाची थेरपी, चेहऱ्यावर नवी चकाकी! पाहा आइस क्युबची कमाल-निस्तेज चेहऱ्यावर येईल तेज

बर्फाची थेरपी, चेहऱ्यावर नवी चकाकी! पाहा आइस क्युबची कमाल-निस्तेज चेहऱ्यावर येईल तेज

Ice Cube Therapy for glowing face : त्वचा दिसेल फारच सुंदर. कोरड्या त्वचेचा त्रास बंद होईल. पाहा सोपी थेरपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 20:12 IST2025-03-06T20:06:48+5:302025-03-06T20:12:03+5:30

Ice Cube Therapy for glowing face : त्वचा दिसेल फारच सुंदर. कोरड्या त्वचेचा त्रास बंद होईल. पाहा सोपी थेरपी.

Ice Cube Therapy for glowing face | बर्फाची थेरपी, चेहऱ्यावर नवी चकाकी! पाहा आइस क्युबची कमाल-निस्तेज चेहऱ्यावर येईल तेज

बर्फाची थेरपी, चेहऱ्यावर नवी चकाकी! पाहा आइस क्युबची कमाल-निस्तेज चेहऱ्यावर येईल तेज

उन्हाळ्यामध्ये चेहर्‍याची प्रचंड काळजी घ्यावी लागते. कारण चेहरा फारच कोरडा पडतो. अगदीच काळवंडून जातो. (Ice Cube Therapy for glowing face)मग आपण पार्लरला जाऊन वेगवेगळ्या मास्कचा किंवा फेसपॅकचा पर्याय निवडतो. जो खरं तर फार महाग असतो. त्यात अनेक रसायनेही वापरलेली असतात. घरगुती उपायच कायम चांगले. आपण घरी वेगवेगळे मास्क तयार करून लाऊ शकतो. तेच वापरायचे. त्याच प्रकारे अनेक नवनवीन पद्धती येत असतात.(Ice Cube Therapy for glowing face) त्याही करून पाहा. 

घरगुती उपाय करून बघण्यात तोटे काही नाहीत. झाला तर फायदाच होतो. मार्च सुरू झाला म्हणजे चेहरा आता कोरडा पडणार. चेहर्‍यालाही हायड्रेशनची गरज असते. चेहरा छान मऊ ठेवण्यासाठी आता आईस फेशिअल घरच्या घरी केले जाते. यामध्ये फार काही करायचे नसते. अगदी सोपी पद्धत आहे. पण चेहऱ्यासाठी तेवढीच फायदेशीरही आहे. विविध प्रकारच्या फळांचे औषधी वनस्पतींचे रस गोठवायचे. मग साध्या पाण्याचा जसा बर्फ आपण चेहर्‍यावर फिरवतो. तसेच त्या  क्युबजही चेहर्‍यावर फिरवायच्या. घरी आरामात तयार करता येण्यासारख्या पाच आइस फेशियल क्युबज आहेत.(Ice Cube Therapy for glowing face)

१. काकडी क्युब
काकडी किसून घ्यायची. तिचा रस काढायचा. तो रस बर्फाच्या ट्रेमध्ये ओतून गोठून घ्यायचा. नंतर ती तयार झालेली क्युब चेहर्‍यावरून फिरवायची. पूर्ण विरघळेपर्यंत फिरवा वाया जाऊ देऊ नका.  काकडी चेहर्‍याला हायड्रेटेड करते. 

२. पपई क्युब
पपईचा मिक्सरमधून रस काढून घ्या. त्यात थोडे पाणी घाला. मग त्याच्याही क्युब तयार करून घ्या. चेहर्‍यावरून फिरवा. नंतर चेहरा धुऊन टाका. कारण तो चिकट होतो. पपई त्वचेसाठी फार चांगली.

३. गुलाब क्युब 
 गुलाबाचे पाणी हे साध्या पाण्यासारखेच असते. त्यामुळे ते तसेच गोठून घ्यायचे. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा. मग त्यावर या क्युब फिरवायच्या. चेहरा लगेच ताजातवाना दिसायला लागतो. गुलाब पाण्याचा वासही छान येतो.

४. कोरफड क्युब
कोरफडीचा अर्क काढून घ्यायचा. तो पाण्यात मिक्स करायचा. मग त्या मिश्रणाचा बर्फ तयार करायचा. चेहर्‍याला लावायचा. 

५. हळद क्युब
आपण हळदीचा लेप चेहर्‍यावर लावतोच. आता या पद्धतीनेही हळद लावून बघा. हळद पाण्यात मिक्स करून त्याची आइस क्युब तयार करून घ्यायची. मग ती चेहर्‍यावर फिरवायची. काळवंडलेला चेहरा पुन्हा स्वच्छ होतो.

Web Title: Ice Cube Therapy for glowing face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.