Join us  

कोरड्या - काळपट त्वचेमुळे त्रस्त आहात, चंदनाचा करा असा वापर, मिळेल नवी चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2023 4:03 PM

Winter Care Skin Tips हिवाळ्यात त्वचेच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात, यातून सुटका मिळवण्यासाठी चंदन करेल मदत..

हिवाळा हा ऋतू प्रत्येकाला आवडतो, मात्र या हिवाळ्यात मुख्य आणि कठीण काम म्हणजे त्वचेची योग्य निगा राखणे. हिवाळ्यात त्वचा रुक्ष, कोरडी आणि निस्तेज पडते. या कालावधीत त्वचेवरील आद्रता कमी होते. त्यामुळे त्वचा काळपट पडू लागते. थंडीच्या दिवसात शरीर हायड्रेटेड राहणं आवश्यक आहे. मात्र, आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो. याचा थेट परिणाम शरीर आणि चेहऱ्यावर पडतो.

त्वचेची समस्या सोडवण्यासाठी आपण विविध महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, हे प्रोडक्ट्स आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. केमिकल्युक्त प्रोडक्ट्सचा वापर न करता आपण घरगुती साहित्यांपासून बॉडी स्क्रब बनवू शकता. चंदन स्क्रब आपल्या त्वचेला नवा निखार देईल. चंदनातील पोषक द्रव्ये त्वचेची सखोल सफाई आणि मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करेल.

साहित्य

चंदन पावडर: १ टीस्पून

बेसन: १ टीस्पून

हळद पावडर: १/२ टीस्पून

कच्चे दूध: पेस्ट बनवण्यासाठी

चंदन स्क्रब बनवण्याची पद्धत

एका बाऊलमध्ये चंदन पावडर, हळद आणि बेसन एकत्र करून मिक्स करा. या पावडरमध्ये कच्चे दूध मिसळून त्याची स्मूद पेस्ट बनवा.

चंदनाची ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, त्यानंतर ही पेस्ट साधारण 20 ते 25 मिनिटे ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

कोरड्या त्वचेसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा ही पेस्ट वापरू शकता.

तेलकट त्वचेसाठी चंदनाची पेस्ट अशी बनवा

साहित्य

चंदन पावडर : २ ते ३ चमचे

तिळाचे तेल: 1 टीस्पून

हळद: एक चिमूटभर

तेलकट त्वचेसाठी चंदन स्क्रब बनवण्याची पद्धत

एका बाऊलमध्ये चंदन पावडर, तिळाचे तेल आणि हळद टाकून चांगले मिक्स करा. सर्वप्रथम, चेहरा चांगले पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर ही पेस्ट लावा.

पेस्ट चेहऱ्यावर चांगली सुकल्यानंतर पाण्याने धुवा. चेहरा धुतल्यानंतर पुसा व शेवटी मॉइश्चरायझर लावा. अशा चेहरा तुकतुकीत आणि तजेलदार दिसेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी