Lokmat Sakhi >Beauty > सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या मेकअप किटमधून आजच काढून टाका 'या' ४ गोष्टी!

सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या मेकअप किटमधून आजच काढून टाका 'या' ४ गोष्टी!

Makeup Kit मेकअप किटमध्ये काय काय आहे, आणि कशाचा त्रास होतो, याकडे लक्ष द्यायला हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 06:39 PM2022-10-31T18:39:40+5:302022-10-31T18:41:23+5:30

Makeup Kit मेकअप किटमध्ये काय काय आहे, आणि कशाचा त्रास होतो, याकडे लक्ष द्यायला हवं

If you want to look beautiful, throw out this 4 things from your makeup kit today! | सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या मेकअप किटमधून आजच काढून टाका 'या' ४ गोष्टी!

सुंदर दिसायचं असेल तर तुमच्या मेकअप किटमधून आजच काढून टाका 'या' ४ गोष्टी!

ir="ltr">आजकाल मेकअप करणे सर्वांना आवडते. बेसिक मेकअप लावायला महिलांना जमते. आता महिलांकडे बेसिक मेकअप कीट हे असतेच. काहींच्या चेहऱ्यावर मेकअप सुट होतो, तर काहींच्या नाही. जास्तकाळ मेकअप चेहऱ्यावर ठेवल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. मेकअप योग्यवेळेवर न काढल्यास त्याचाही त्रास होतो. मेकअप काही काळ तुम्हाला सुंदर बनवेल परंतु, मेकअप योग्यवेळेवर न काढल्यास तुमच्या चेहऱ्यावर अनेक डाग उद्धभवू शकतात. यासह जर आपण काही एक्सपायरी वस्तू मेकअप कीटमधून योग्यवेळेवर नाही काढले, तर त्या गोष्टी आपल्या चेहऱ्याला इजा पोहचवू शकते. म्हणून या विशिष्ट गोष्टी लगेच मेकअप कीटमधून काढून टाकणे गरजेचं आहे. 

ब्यूटी ब्लेंडर

मेकअप फिक्स करण्यासाठी आपण ब्यूटी ब्लेंडरचा वापर अधिक करतो. मेकअप मिक्स करणे ते मेकअप चेहऱ्यावर लावणे यासाठी आपण ब्यूटी ब्लेंडरचा वापर करतो. परंतु, खरेदी करण्यापूर्वी ब्युटी ब्लेंडर नवे आहे की जुने याची पडताळणी करूनच खरेदी करावे. आणि अधिकवेळा वापरलेले ब्लेंडर देखील वापरण्यास बंद करावे. कारण, त्या ब्लेंडरमध्ये अनेक बॅक्टेरीया आढळून येतात जे आपल्या चेहऱ्यासाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे जुने ब्लेंडर वापरणे बंद करावे.

लिपस्टिक

लिपस्टिक आपल्या ओठांना नवी चमक देते आणि आपला चेहरा या ओठांमुळे अधिक खुलून दिसतो. मात्र, लिपस्टिकला देखील एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी झालेली लिपस्टिक लावणे टाळावे. या लिपस्टिकमुळे आपले ओठ काळे पडू शकतील. त्यामुळे जे लिपस्टिक एक्सपायरी झाले असतील. ती लिपस्टिक ताबडतोब मेकअप कीटमधून काढून टाकावे.

क्रीम

कोणत्याही व्हाईटनिंग क्रीममध्ये अधिक प्रमाणात रासायनिक गोष्टी आढळून येतात. जे आपल्या चेहऱ्यासाठी धोकादायक ठरू शकतात. अश्याप्रकारच्या क्रीम लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणि निखार हिरावून घेते. त्यामुळे व्हाईटनिंग क्रीम बहुतांशवेळा टाळावे.

मस्कारा

जर तुमचा मस्कारा हा जुना किंवा सुकून गेला असेल. तर, तो मस्कारा लावणे बंद करावे. कारण सुकलेला मस्कारा लावल्याने तुमच्या डोळ्यांना खाज, जळजळ किंवा इजा पोहचू शकते. त्यामुळे सुकलेला मस्कारा लवकरात लवकर आपल्या मेकअप कीटमधून काढून टाकावे.

काजळ

बहुतांशवेळा आपण काजळ वापरताना त्याची एक्सपायरी डेट गेली आहे कि नाही हे पाहत नाही. आपण तसेच काजळाचा वापर करतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांना खाज, जळजळ आणि डोळ्यांना सूज देखील येऊ शकते. त्यामुळे जर काजाळावरील एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर त्याचा वापर टाळावे. सहा महिने झाल्यानंतर काजळ बदलावे.

Web Title: If you want to look beautiful, throw out this 4 things from your makeup kit today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beauty TipsMakeup Tipsब्यूटी टिप्समेकअप टिप्स