जायफळ (nutmeg) म्हणजे मसाल्याच्या पदार्थातील एक सुंगधी मसाला. गोड पदार्थांची चव वाढवणारं जायफळ (nutmeg for health benefits) हे त्यातील औषधी गुणधर्मामुळे प्रत्येकाच्या घरात असतंच. या जायफळचा उपयोग त्वचेसाठीही करता येतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे पेशी मरतात आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. त्वचा निस्तेज दिसते. रोजच्या धावपळीमुळे आपल्यावर तो ताण येतो त्याचा परिणाम शेवटी त्वचेवर होतो. निस्तेज त्वचा वयस्करही दिसते. त्वचेवरचा हा परिणाम टाळण्यासाठी जायफळाचा (nutmeg benefits to skin) उपयोग होतो. त्वचा तरुण दिसण्यासाठी स्वयंपाकघरातल्य या सुगंधी मसाल्याची मदत घेता येते. जायफळात ॲण्टिऑक्सिडण्ट्स आणि ॲण्टि एजिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवर तेज आणण्यासाठी , त्वचा तरुण दिसण्यासाठी(nutmeg face pack for youthful skin) फायदेशीर ठरतात.
Image: Google
तरुण त्वचेसाठी जायफळाचा लेप
जायफळाचा लेप तयार करण्यासाठी जायफळ पावडर, दही आणि मध एवढीच सामग्री लागते. जायफळाचा लेप तयार करताना जायफळ फोडून मिक्सरमधून त्याची पूड करुन घ्यावी. एका वाटीत 2 चमचे जायफळ पावडर, 2 चमचे दही आणि 2 चमचे मध घ्यावं. ही सर्व सामग्री एकजीव करुन घ्यावी. हे दाटसर मिश्रण ब्रशनं चेहेऱ्यावर लावावं. लेप साधारणत: 10 मिनिटं चेहेऱ्यावर सुकू द्यावा. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा. आठवड्यातून दोन वेळा हा लेप लावल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसतात.
Image: Google
जायफळाचा लेप लावल्यास
1. जायफळाच्या लेपामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
2. चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या असतील आणि त्या कोणत्याही उपायानं जात नसतील तर जायफळाचा उपाय अवश्य करुन पाहावा. जायफळाच्या लेपामुळे मुरुम पुटकुळ्या कमी होतत. सोबतच चेहेऱ्यावर पडलेले मुरुम पुटकुळ्यांचे डागही निघून जातात.
3. चेहेऱ्यावरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं आणि चेहेऱ्याचा काळपटपणा कमी होण्यासाठी जायफळाचा लेप परिणामकारक समजला जातो.
4. तेलकट त्वचेसाठीही जायफळ फायदेशीर ठरतं. तेलकट त्वचेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, बंद होणारी रंध्रं यावर जायफळचा लेप उत्तम उपाय करतो. जायफळामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. रंध्रातील घाण स्वच्छ होते. जायफळामुळे तेलकट त्वचा स्वच्छ होते, सतेज दिसते.