Join us  

Bath Salt Benefits: उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरा बाथ सॉल्ट! हे बाथ सॉल्ट असतं काय? कधी - कसं वापरायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 7:53 PM

Summer Special Beauty Tips: उन्हाळ्यात खूप घाम घाम होतो आणि शरीराचा दुर्गंध (body odour) येतो.. हा त्रास कमी करण्यासाठी तसेच थकवा घालवून फ्रेश होण्यासाठी बाथ सॉल्ट अतिशय उपयुक्त ठरतं...

ठळक मुद्देसॉल्टमधे असणारे कॅल्शियम आणि पोटॅशियम शरीराचा थकवा, ताण घालविण्यासाठी उपयुक्त ठरतात.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास खूप वाढलेला असतो. बाहेरची उष्णता आणि शरीरात कमी झालेली पाणी पातळी यामुळे या दिवसांत खूप लवकर थकवा येतो. तसेच घाम खूप येत असल्याने अंगाला कायम एक प्रकारची दुर्गंधी जाणवते. हा त्रास कमी करण्यासाठी उन्हाळ्यात खास सॉल्ट बाथ घेतला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मीठ टाकून केलेली आंघोळ.. पण यासाठी मात्र काही खास फ्लेवर्ड सॉल्ट (special bath salt) वापरले जातात. हा नवा ट्रेण्ड सध्या चांगलाच हिट झाला आहे. तुम्हीही फ्रेश होण्यासाठी एकदा अशा प्रकारची आंघोळ  करून बघा.. (benefits of bath salt)

 

सॉल्ट बाथ घेण्याचे फायदे- सॉल्टमधे असणारे कॅल्शियम आणि पोटॅशियम शरीराचा थकवा, ताण घालविण्यासाठी उपयुक्त ठरतात. - शरीर एक्सफोलिएट करून त्वचा मऊ, मुलायम बनविण्यासाठी सॉल्टमधली खनिजे मदत करतात.- बॉडी पेन कमी करण्यासाठी फायदेशीर- त्वचेला खाज येणे, सोराययिस, कोरडी त्वचा असा त्रास कमी करण्यासाठी सॉल्ट बाथ फायद्याचे ठरते. - उन्हाळ्यात खूप जास्त टॅनिंग होतं. त्यावरचा उपाय म्हणूनचही सॉल्ट वापरले जाते. - सॉल्ट बाथचे क्रिस्टल्स त्वचेचे स्क्रबिंग करून त्वचा स्वच्छ करतात.

 

कसे वापरायचे बाथ सॉल्ट?- बाथ टबमध्ये आंघोळ करणार असाल तर पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये एक कप बाथ सॉल्ट टाका. ते विरघळू द्या त्यानंतर २० मिनिटांनी आंघोळ करा.- अशाच पद्धतीने बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणार असाल तर सर्वसाधारण आकाराच्या एका बादलीमध्ये एक टेबलस्पून एवढे बाथ सॉल्ट टाकावे. 

 

हे सॉल्ट बाथ वापरणे ठरते अधिक फायदेशीर१. ऑरेंज बाथ सॉल्टसंत्री फ्लेवर असणारं हे बाथ सॉल्ट संत्र्याप्रमाणेच पिवळट केशरी रंगाचं असतं. संत्रीप्रमाणेच येणारा त्याचा आंबट गोड सुवास त्वचेला एक वेगळाच फ्रेशनेस देतो. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी जर बाथ सॉल्ट घ्यायचा असेल तर ऑरेंज बाथ सॉल्ट त्यासाठी एक उत्तम निवड ठरू शकतो.२. लवेंडर बाथ सॉल्टया सॉल्टचा आल्हाददायक मंद सुवास तुमचा सगळा थकवा, मरगळ घालवून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे जेव्हा खूप थकल्यासारखे वाटत असेल किंवा उगीचच खूप आळस आल्यासारखे वाटत असेल तर लवेंडर बाथ सॉल्ट वापरून आंघोळ केल्याने एकदम उत्साह वाटू लागेल. सनबर्न झाले असल्यास थंडावा मिळण्यासाठी हा सॉल्ट वापरणे अधिक चांगले.३. लेमनग्रासशरीराचा दुर्गंध घालविण्यासाठी, त्वचेचा काही त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी लेमनग्रास बाथ  सॉल्ट वापरावे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजी