Join us  

मेकअप करायचाय पण चुकायची भीती वाटते? करा फक्त ६ गोष्टी- झटपट मेकअप करुन तुम्ही दिसाल कमाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2023 4:19 PM

In This Way, You Can Do Your Own Makeup In 15 Minutes, Read Step By Step Guide : मेकअप करायला आवडतो पण शोभेल असा मेकअप नाही झाला तर अशी भीतीही वाटते, त्यासाठीच या सोप्या टिप्स

मेकअप करायला प्रत्येक स्त्रीला आवडतंच. ऑफिसमध्ये जाणारी तरुणी असो किंवा कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, आजकाल सगळेच थोडासा का होईना मेकअप करतातच. मेकअप करणे ही वाईट गोष्ट नाही. बदलत्या काळानुसार मेकअप ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मेकअप साधेपणाने केला तर तो आपल्या सौंदर्यात भर घालू शकतो. मेकअप करणं ही एक कला आहे आणि आवश्यक नाही की प्रत्येक जण या कलेत पारंगत असेलच. मेकअप हे खूप मोठं क्षेत्र आहे.

मेकअप करण्यापासून ते मेकअपमधील बारकावे आणि मेकअप करताना होणाऱ्या चुकाही ह्यात सामील आहेत. आपल्यापैकी काहीजणी घरून निघताना अगदी पूर्ण मेकअप करूनच बाहेर पडतात तर काही मुली काजळ व लिपस्टीक लावून रेडी होतात. प्रत्येकीची मेकअप करण्याची आवड आणि परिभाषा वेगळी असते. काहींना मेकअप करायला आवडत तर असतं पण मेकअप करता येत नाही. यासाठीच काही सोप्या स्टेप्स वापरुन आपण झटपट मेकअप करुन तयार होऊ शकतो(In This Way, You Can Do Your Own Makeup In 15 Minutes, Read Step By Step Guide).

मेकअप करण्याच्या ६ बेसिक स्टेप्स :-  

१. मॉइश्चरायझर व सनस्क्रीन :- चेहऱ्याला योग्य पद्धतीने मॉइश्चराइज व सनस्क्रीन न लावता मेकअप केल्यास, आपल्याला हवा तास परफेक्ट लूक येणार नाही. जर आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे मॉइश्चराइज व सनस्क्रीन लावलेले नसेल तर कितीही मेकअप केल्यास तो आपल्या चेहऱ्याला परफेक्ट लुक देऊ नाही शकणार. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर चांगले मॉइश्चरायझर लावा. यानंतर चेहऱ्यावर तसेच हात-पायांवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. 

२. मेकअपसाठी बेस खूप महत्वाचा :- मेकअप करण्यापूर्वी चेहेऱ्यावर बेस लावणे खूप महत्वाचे असते. जर आपल्या चेहऱ्यावर बेस व्यवस्थित बसला असेल तर आपला मेकअप उठून दिसतो. बेस चांगला करण्यासाठी चेहऱ्यावर लाइट फाउंडेशन किंवा बीबी - सीसी क्रीमचा वापर करावा. चेहऱ्यावर कोणत्याही क्रीमचा बेस लावल्यानंतर तो ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने व्यवस्थित स्किनमध्ये मिसळून घ्यावा. बेस चेहऱ्यावर लावल्यानंतर स्किनला तो बेस शोषून घेण्यासाठी थोडा वेळ थांबा. जर आपण उष्ण किंवा दमट जागी राहत असाल तर हेव्ही फाउंडेशन वापरू नका. नाहीतर आपला चेहरा गुळगुळीत होईल तसेच वारंवार घाम घेऊन मेकअप खराब होईल.

३. कन्सीलर वापरा :- जर आपल्या चेहऱ्यावर काळी वर्तुळे, पिंपल्स किंवा डाग असतील तर कन्सीलर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या स्किनपेक्षा एक टोन हलका असलेले कन्सीलर नेहमी खरेदी करा आणि अगदी आवश्यक असेल तिथेच वापरा. संपूर्ण चेहऱ्याला कन्सीलर लावण्याची गरज नाही. 

४. कॉम्पॅक्ट आणि ब्लशचा वापर :- मेकअप सेट करण्यासाठी, संपूर्ण चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावा आणि नंतर हलका ब्लशचा वापर करा. चेहऱ्याच्या एका बाजूच्या गालाच्या हाडांपासून दुसऱ्या बाजूच्या गालाच्या हाडांवर ब्लश लावा. याशिवाय नाकाच्या टोकावर, कपाळावर आणि मानेवर थोडेसे ब्लश जरुर लावा. यामुळे आपला चेहरा ग्लोईंग दिसण्यास मदत होईल. 

५. आय मेकअप व लिपस्टिक : - चेहेऱ्याच्या मेकअप प्रमाणेच डोळ्यांचा व ओठांचा मेकअप करणे देखील तितकेच महत्वाचे असते. डोळ्यांवर आयलायनर आणि मस्करा लावल्यानंतर आपल्या आवडत्या रंगाची लिपस्टिक किंवा आउटफिटसोबत मॅचिंग लिपस्टिकही लावू शकता. जर आपल्याला लिपस्टिक आवडत नसेल तर आपण लिप ग्लॉस किंवा लिप बाम देखील वापरू शकता.

६. मेकअपसोबत हेअर स्टाईलही महत्त्वाची :- आपला लूक परफेक्ट दिसण्यासाठी उत्तम मेकअपसोबतच सुंदर हेअर स्टाईलही करणे महत्त्वाचे आहे. आपण करत असलेली हेअर स्टाईल आपल्या चेहेऱ्याला व व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल अशीच असावी. जर आपल्याला एखादी हेअर स्टाईल करायची इच्छा नसेल तर आपण केस मोकळे सोडू शकता. सध्या सॉफ्ट कर्ल्सचा लूक खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे आपण हलकेच कर्ल्स किंवा स्ट्रेटनिंग करु शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी