Join us  

केस खूपच पातळ झालेत ? दाट - मजबूत केसांसाठी हा घ्या आयुर्वेदातील खास उपाय, सुंदर केसांची हमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 8:41 PM

Hair Growth: Ayurvedic Tips & Remedies for Thicker Hair : Natural Home Remedies for Thick Hair : केस गळून फारच पातळ दिसत असतील तर करा एक घरगुती उपाय, केस होतील घनदाट...

बदलती लाइफस्टाइल, वाढते प्रदूषण यांच्या आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे केसांची वाढ, पोत यात बराच फरक दिसून येतो. अशावेळी  केसांचे आरोग्य चांगले राहावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपण अनेक उपायही करून बघतो. या उपायांमध्ये आपण नैसर्गिक आणि केमिकल्सयुक्त अशा दोन्ही पर्यायांचा वापर करतो. परंतु हे असंख्य उपाय करूनही काहीवेळा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी नैसर्गिक गोष्टी जास्त फायदेशीर असतात(Regrow Your Hair Naturally with Ayurvedic Treatment).

 प्रदुषण व केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा केसांवर वाईट परिणाम होत असतो. अशावेळी नैसर्गिक उपायांनी केसांचे आरोग्य सांभाळता येते. केसांच्या वाढीसाठी निसर्गाने दिलेल्या अनेक गोष्टींचा वापर करता येतो. लहान केस लवकर वाढावेत आणि पातळ केस घनदाट होऊन सुंदर दिसावेत म्हणून आपण अनेक उपाय(Natural Home Remedies for Hair Thinning) करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. केस सुंदर, घनदाट, लांबसडक आणि मजबूत होण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत, ते पाहूयात(Natural Home Remedies for Thick Hair).

केस दाट आणि लांब करण्यासाठी घरगुती उपाय... 

१. सगळ्यातआधी एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि भृंगराज पावडर घ्यावी. २. हे दोन्ही एकत्रित मिक्स करुन त्याचा हेअर मास्क तयार करावा. ३. हा हेअर मास्क स्कॅल्पपासून केसांच्या खालच्या टोकांपर्यंत लावावा. ४. हा हेअर मास्क केसांवर १ ते २ तास राहू द्या.५. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. ६. हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान १ ते २ वेळा करावा. 

आंघोळ केल्यावर डोळे लालबुंद होतात ? ही असू शकतात कारणं, करा सोपे ४ उपाय...  

 एलोवेरा जेल आणि भृंगराज यांचा हा घरगुती हेअर मास्क केसांना लावल्यास काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल.

केसांना भृंगराज लावण्याचे फायदे... 

१. केसांची वाढ होण्यास मदत होते.२. पांढरे केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरते.३. नवीन केस वाढण्यात आणि केस मजबूत करण्यास मदत करते. 

केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्हींचे पोषण देणारा आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय... 

केसांना एलोवेरा जेल लावण्याचे फायदे... 

१. एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन - ए, व्हिटॅमिन - सी आणि व्हिटॅमिन - बी असते ज्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते.२. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना हायड्रेट करण्यास मदत करतात.३. एलोवेरा जेलमध्ये अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून वाचवतात.

डोळ्यांवर कुणी पॅक लावते? लावा नॅचरल घरगुती आय पॅक, डोळे दिसतील सुंदर-जळजळही होईल कमी...

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स