लहानपणापासून आपल्याला केसांना तेल लावण्याचा सल्ला मिळत आला आहे. केसांना तेल लावल्याने त्याची योग्यरित्या वाढ होते. याने केसांच्या निगडीत अनेक समस्या दूर होतात. मात्र, तेल लावण्याची योग्य पद्धत माहित असणे गरजेचं आहे. यासंदर्भात पोषणतज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात, ''केसांना तेल लावल्याने त्वचा, डोळे आणि पोटाच्या समस्या टाळता येतात. अशा परिस्थितीत, आपल्याला फक्त तेल लावण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे.'' यासोबतच त्यांनी चंपीसाठी खास तेलाची माहिती दिली आहे(Head Massage: Benefits, Types & Procedures with Homemade Oil).
चंपीसाठी बनवा खास तेल
सर्वप्रथम, लोखंडी कढईत खोबरेल तेल गरम करा. आता गॅस बंद करून वर कढीपत्ता, हलीम बिया, मेथीचे दाणे, जास्वंदाचे फुल घाला. आता हे तेल रात्रभर तसेच ठेवा. रात्रीच्या वेळी या गोष्टींचे पोषक घटक तेलात मिसळतात. हे तेल सकाळी गाळून केसांना लावा, व मालिश करा.
केसांवर तेल लावण्याची योग्य पद्धत
डोक्याच्या मध्यभागी तेल लावा
चंपी करताना आधी डोक्याच्या मध्यभागी तेल लावा. साधारण प्रथम मध्यभागी तेल लावले जाते. तिथे जास्तीत जास्त उष्णता निर्माण होते. यासह तणाव आणि उच्च बीपीची समस्या देखील येथून उद्भवू शकते. अशावेळी डोक्याच्या मध्यभागी तेल लावल्याने मेंदूसह संपूर्ण शरीर तणावमुक्त होण्यास मदत होते.
३ वेळा डोक्यावर थाप मारा
तेल लावताना डोक्यावर २ ते ३ वेळा थाप मारा. ही पद्धत तुमचे मन शांत करण्यासाठी, यासह न्यूरल प्रक्रियाला रिलेक्स करते.
डोकं खूप खाजवतं, काम सुचत नाही? केसांतलं इन्फेक्शन त्रासदायक, त्वरित करा ५ उपाय
बोटांच्या टोकांनी कानाजवळ मसाज करा
बोटे कानाजवळ आणून बिंदूंवर थोडा दाब द्या, व हलक्या हातांनी मसाज करा.
डोक्याच्या खालच्या भागात ५ वेळा तेल लावा
डोक्याच्या खालच्या भागात जिथे टाळू जास्त कोरडी आहे, तिथे 5 वेळा तेल लावा. रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच मानसिक शांती मिळेल.
कानाच्या पुढील भागात तेल लावा
डोक्याच्या खालच्या भागात तेल लावल्यानंतर हात कानाभोवती आणा. येथे तेल लावून हलक्या हातांनी मसाज करा.
कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..
मानेला हलक्या हातांनी ५ वेळा मसाज करा
चंपी तेल घेऊन मानेला हलक्या हातांनी ५ वेळा मसाज करा. असे केल्याने शरीराच्या हालचाली शांत होण्यास मदत होईल.
छातीवर थोडे तेल लावून खांद्यापर्यंत मसाज करा
शेवटी छातीवर थोडे तेल लावून त्याच हाताने खांद्यापर्यंत मसाज करा. यामुळे शरीराला आराम मिळेल.