Join us  

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 4:29 PM

Instant Dip & Twist Nail Paint Remover : How to Remove Nail Polish Without Cotton Balls : नखांवरील नेलपेंट काढण्यासाठी कापूस, कॉटन पॅडची गरजच नाही, करा हा उपाय, कापूस - नेलपेंट रिमूव्हरची होईल बचत...

हातापायांची नखं सुंदर, आकर्षक दिसावीत म्हणून आपणं त्यांची विशेष काळजी घेतो. नखांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आपण वेळच्यावेळी मेनिक्युअर करतो. एवढंच नव्हे तर नखांवर नेलपेंट लावतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं नेलं आर्ट करतो. महिलांना नेलपॉलिश लावायला आवडते, कारण त्याच्या वापराने त्यांची नखं आणखीनच सुंदर दिसतात. नेलपॉलिशचे अनेक प्रकार आजकाल बाजारात अगदी सहज विकत मिळतात. नेलपॉलिशचे निरनिराळे प्रकार, टेक्चर, रंग नखांवर ट्राय केले जातात. बरेचदा नेलपेंट चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांवर ती व्यवस्थित पद्धतीने लागत नाही(Dip & Twist Nail Polish Remover). 

नेलपेंट लावताना काहीजणींचा हात थरथरतो त्यामुळे नेलपेंट नखांबरोबरच बाजूच्या स्किनवर देखील लागते. याचबरोबर कधी आपल्या ड्रेसला मॅचिंग रंगांची नेलपेंट नखांवर लावायची असते, यासाठी जुनी नेलपेंट नखांवरून काढावी लागते. नेलपेंट नखांवरुन काढण्यासाठी आपण नेलपेंट रिमूव्हरचा वापर करतो. नेलपेंट नखांवरुन काढण्यासाठी आपण कापूस किंवा कॉटन पॅड (How to Remove Nail Polish Without Cotton Balls) घेऊन त्यावर नेलपेंट रिमुव्हर लावतो, आणि याने पुसून नेलपेंट काढतो. परंतु असे करताना काहीवेळा नेलपेंट रिमुव्हर सांडते किंवा नेलपेंट नखांवरुन व्यवस्थित निघत नाही. अशावेळी आपण एका नव्या सोप्या ट्रिकचा वापर करून झटपट नखांवरील नेलपेंट अगदी झटपट काढू शकता. यासाठी आपल्याला नखांवर कापसाचा बोळा आणि रिमुव्हर घासत बसण्याची गरजच भासणार नाही. नेलपेंट रिमूव्ह करण्याची ही कोणती नवी भन्नाट ट्रिक आहे ते पाहूयात(Instant Dip & Twist Nail Paint Remover).

साहित्य :- 

१. स्पंज - १ छोटा तुकडा२. काचेचे छोटीशी बाटली - १ बाटली३. नेलपेंट रिमूव्हर - २ ते ४ टेबलस्पून ४. छोटासा चिमटा - १ चिमटा 

नेलपेंट रिमुव्ह करण्याची ही भन्नाट साधीसोपी ट्रिक... 

letsmakeez या इंन्स्टाग्राम पेजवरून ही नेलपेंट रिमुव्ह करण्याची भन्नाट ट्रिक शेअर करण्यात आली आहे. यासाठी सगळ्यात आधी एक स्पंज घेऊन त्या स्पंजच्या बाजूच्या कडा कापून घ्याव्यात. आता काचेची एक छोटीशी बाटली घ्यावी. शक्यतो या बाटलीचे तोंड मोठे असावे. एकावेळी आपले एक बोट त्यात अगदी व्यवस्थित सहजपणे जाईल अशी बाटली घ्यावी. यासाठी आपण लहान मुलांच्या वॉटर कलरच्या छोट्याशा बाटल्या देखील वापरू शकतो.

कुरळे केस हवे की कर्ल्स? नवरात्रात गरबा खेळायला जाताना चटकन करा २ भन्नाट उपाय...

आता ही बाटली घेऊन त्या स्पंजवर आडवी धरून बाटलीचे योग्य ते माप घ्यावे. आता या मापानुसार, त्या बाटलीच्या उंचीचा अंदाज घेऊन या स्पंजची एक लांब पट्टी कापून घ्यावी. आता या स्पंजवर थोड्या ठरविक अंतरावर हलकेच कापून खाच तयार करून घ्याव्यात. आता ज्या भागावर खाच पाडून घेतल्या आहेत तो भाग आतल्या बाजूला येईल अशा पद्धतीने ती स्पंजची पट्टी गोलाकार गुंडाळून घ्यावी. आता हा गोलाकार गुंडाळून घेतलेला स्पंज या काचेच्या बाटलीच्या आत ठेवून द्यावा. त्यानंतर चिमट्याच्या मदतीने या स्पंजवरील खाचा थोड्या मोकळ्या करून या बाटलीच्या बरोबर मधोमध आपले बोट जाईल इतकी जागा ठेवावी. आता या स्पंजमध्ये नेलपेंट रिमूव्हर ओतावे. 

लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...

गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय...

याचा कसा वापर करावा ? 

या बाटलीच्या बरोबर मधोमध असणाऱ्या भागात आपले नेलपेंट लावलेले नख ठेवावे. आता या स्पंजमधील खाचांमध्ये आपले बोट अडकवून बाटली गोलाकार फिरवून घ्यावी. या बाटलीत असणारा स्पंज आणि नेलपेंट रिमुव्हर यामुळे आपल्या नखांवरील नेलपेंट अगदी सहजपणे निघण्यास मदत होईल. या सोप्या ट्रिक्सचा वापर केल्यास आपल्याला नेलपेंट रिमुव्हर कापसाच्या बोळ्याला लावून वारंवार नखांवर घासत  बसावे लागणार नाही. अशा प्रकारे आपण फारसा पसारा न घातला अगदी झटपट पद्धतीने नखांवरील नेलपेंट काढू शकता.    

टॅग्स :ब्यूटी टिप्स