सकाळ झाली सगळ्यात पहिल्यांदा चहा किंवा कॉफीची आठवण येते. चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना दिवस सुरू झाल्यासारखा वाटतच नाही. पण, नेहमीच चहा सोडावा का? असे विचार मनात येत असतात. पण आज आम्ही तुम्हाला जागतिक चहा दिवसानिमित्त (International tea day ) चहाचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही चहा सोडण्याचा विचार मनातून काढून टाकाल. चला तर मग जाणून घेऊया चहाचे फायदे काय आहेत.
चमकदार केसांसाठी
चहा पिणे जसे शरीरासाठी चांगले आहे. तसेच चहाचे इतर फायदेही आहेत. केस चमकदार व्हावेत यासाठी ग्रीन टीचा वापर केला जातो. त्यासाठी ग्रीन टीच्या तीन बॅग उकळत्या पाण्यात टाकून पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून त्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार होतात. केस गडद होण्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर केला जातो. याशिवाय, भाजल्यावर चहापावडर भिजवून फ्रीजमध्ये ठेवून त्याने शेक दिला जातो. त्याने लवकर फरक पडतो असेही म्हणतात.
ग्रीन किंवा ब्लॅक टीच्या वापरानं निस्तेज केसांना उत्तेजन मिळते. उकळत्या पाण्यात फक्त चहाच्या पिशव्या 15 मिनिटे ठेवा आणि काही तास किंवा रात्रभर थंड होऊ द्या. ते नव्याने धुतलेल्या केसांवर घाला आणि दहा मिनिटे सोडा. त्यानंतर शॅम्पू किंवा कंडिशनरनं केस स्वच्छ धुवून टाका.
सनबर्न कमी होते
अनेकांना उन्हामुळे काळपट त्वचा, मानेवरच्या टॅनिंगचा सामना करावा लागतो. टी बॅग्सच्या वापरानं वेदना आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. कॅमोमाईल टी च्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे याचा तुमच्या त्वचेला अधिक फायदा मिळतो. यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी बनवून घ्या. त्यामध्ये टॉवेल भिजवा आणि पाणी पिळून घ्या. नंतर तुमच्या सनबर्न झालेल्या त्वचेवर लावा. हा उपाय केल्यानं त्वचेचा काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.
डास चावल्यामुळे येणारी पुरळ, जखमांवर गुणकारी
डास चावल्यानंतर अनेकदा त्वचा लाल होते प्रचंड खाज येते. अशावेळी टी बॅग्स फायदेशीर ठरू शकतात. कॅमोमाईल टी चा देखील वापर या समस्येसाठी गुणकारी ठरेल. रोमन्स, ग्रीक्स आणि इजिप्शियन्स लोक याचा जखम बरी करण्यासाठीदेखील वापर करतात. यामध्ये अँटीमायक्रोबायल आणि अँटीइन्फ्लेटरी गुण असल्यामुळे जखम लवकर बरी होण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय इतर त्वचेच्या समस्यांसाठीसुद्धा याचा वापर फायदेशीर ठरतो.
शेविंगनंतरची जळजळ कमी करण्यासाठी
जर रेजरचा वापर केल्यानंतर तुमच्या पाया किंवा हातांवर जास्त वेदना जाणवत असतील तर तुम्ही टी बॅग्सचा वापर जळजळ कमी करण्यासाठी वापरू शकता. रेजरच्या वापराळे जळजळ होत असेल तर शेविंगनंतर त्या ठिकाणी टी बॅग्स ठेवून पाहा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
पिंपल्स एक्ने कमी होण्यास मदत होते
एक्ने किंवा पिंपल्सची समस्या ही सगळ्यांनाच उद्भवते. त्यावर उपचार करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. अनेकदा या समस्या कमी व्हायला मागत नाहीत. अशावेळी टी बॅग्सचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये असलेल्या अँटिसेप्टिक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणांमुळे एक्ने कमी होण्यास मदत मिळते. तसंच याचा नियमित वापर केल्यास पिंपल्स, एक्नेची समस्या कायमची दूर होऊ शकते.
डार्क सर्कल्स दूर होतात
ब्लॅक टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांभोवतालची डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होईल. चहा चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होऊन चेहऱ्यावरील काळे डागही नाहिसे होतात. या चहामधील अँटीआॅक्सीडेंट्स न्यूट्रिएंट्स अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर करतात. यासाठी दूध न टाकता पिलेला चहा जास्त फायदेशीर ठरतो तसेच यासोबतच साखरेऐवजी मध टाकल्याने आरोग्याला फायदा होईल असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.