केस गळतीमुळे आजकाल बरेचजण नैराश्यात असतात. पुरूष असो किंवा महिला प्रत्येकालाच केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. (Hair Care Tips) उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या वाढते कारण धूळ, प्रदूषण आणि घामामुळे केसाचं गळणं वाढतं. काहीजणांना केस गळतीमुळे ताण-तणाव येतो. काहीजण हेअर ट्रिटमेंट्स करून घेतात किंवा बाजारातून महागडे प्रोडक्ट्स विकत घेतात. (Hair Fall Solution)
सुरूवातीला चांगले वाटत असले तरी या केमिकल्सयुक्त पदार्थांचे अनेक दुष्परीणाम असू शकतात. केस गळती कमी करण्यसाठी एक सोपा उपाय फायदेशीर ठरू शकतो. यामुळे केसांचा विकास वेगानं होईल आणि केसांचा पोतही सुधारेल. (Do Inversion Method for Hair Growth for 5 minutes every day before sleeping hair will grow faster)
इन्वर्जन मेथड करण्याची योग्य पद्धत (Inversion Method for Hair Growth)
इन्वर्जन मेथडसाठी तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. तीळाचं तेल, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑईल. तेल सगळ्यात आधी कोमट गरम करून घ्या आणि एका बाटलीत भरा. नंतर स्काल्पला हे तेल लावा आणि कंगव्याच्या साहात्यानं सर्व केसांना तेल लावून घ्या आणि मसाज करा. यामुळे हेअर फॉलिकल्स उत्तेजित होतील. तुमचे केस उलट्या दिशेनं ठेवा.
वयापेक्षा १० वर्ष लहान दिसाल, रोज ५ योगासनं करा; कायम तरुण-निरोगी राहण्याचं सोपं सिक्रेट
यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन तेल सर्व स्काल्पमध्ये पसरेल. जर तुम्ही जास्तवेळ डोकं या स्थिती ठेवू नका २ ते ३ मिनिटांनी सामन्य स्थितीत या. नंतर केस व्यवस्थित धुवा. २ ते ३ आठवडे हा उपाय केल्यास चांगला परीणाम दिसून येईल आणि केसांची वाढ होईल.
डोकं उलटं करून झोपा (Inversion Method)
केस वाढवण्यासाठी इन्वर्जन मेथड खूप प्रभावी आहे. ही पद्धत करण्यासाठी आपली मान अंथरूणाच्या दिशेने उलटी ठेवा यामुळे तुम्हाला आराम मिळेल, रोज रात्री झोपण्याआधी जवळपास ४ मिनिटांसाठी हा उपाय केल्यानं केसांचा चांगला विकास होईल. याशिवाय मेंटल हेल्थही सुधारेल. यामुळे रक्त प्रवाहही व्यवस्थित होतो. मानेचं दुखणंही कमी होतं. याशिवाय तुम्हाला केसांची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. नियमित ऑयलिंग करा, चांगला आहार घ्या ज्यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल.
या समस्या असतील तर इन्वर्जन मेथड करू नका
१) जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या असतील हे योगासन करू नका.
२) गर्भवती महिलांनी या प्रकारचे योगा प्रकार करू नये.
३) जर तुम्हाला वर्टिगो असेल तर हे करणं टाळा.
४) जर डोळ्यांची लेजर सर्जरी झाली असेल या प्रकारचे योगासन करू नका