मेकअप करण्यासाठी आपण वेगवेगळ्या विविध साधनांचा वापर करतो. या साधनांमध्ये ब्रश, पावडर पफ, ब्युटी ब्लेंडर, स्पंज अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. या साधनांचा वापर करून आपण मेकअप अतिशय सहजरित्या करू शकतो. ही साधने आपण जितक्या सुलभतेने वापरतो तितकेच त्यांची सफाई आणि स्वच्छता करणे गरजेचे असते. मेकअप करण्याची ही साधने वेळोवेळो स्वच्छ करून ठेवली पाहिजेत.
मेकअप करण्यासाठी लागणारे ब्रश, स्पंज, पफ किंवा इतर साधने स्वच्छ केली नाहीत तर ती खराब होऊन त्यावर बुरशी येण्याची शक्यता असते. जर या साधनांची योग्य ती काळजी घेतली नाही तर याचा परिणाम आपल्या स्किनवर देखील होऊ शकतो. ही खराब साधने आपण तशीच वापरली तर आपल्या स्किनला इजा होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा घाईघाईत आपण ही साधने स्वच्छ करत नाहीत यामुळे स्किनवर पुरळ येणे, खाज सुटणे, स्किन रॅश होणे, लाल होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे आपल्या मेकअप किटमधील साधने वेळोवेळी स्वच्छ करा. मेकअप किटमधील ब्युटी ब्लेंडर स्पंज सोप्या ३ पद्धतीने कसा स्वच्छ करू शकतो ते समजून घेऊयात(How To Clean a Beauty Blender).
नक्की काय उपाय आहे ?
१. बेसिक क्लिनिंग (Basic Cleansing) - ब्युटी ब्लेंडर स्पंज जर तुम्ही रोज वापरत असाल तर त्याचे बेसिक क्लिनिंग करणे अतिशय महत्वाचे आहे.
१. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात माईल्ड बेबी शॅम्पू किंवा माईल्ड हॅन्ड वॉशचे ३ ते ४ थेंब घाला. या मिश्रणात हा ब्युटी ब्लेंडर स्पंज किमान ३० मिनटे बुडवून ठेवा.
२. त्यानंतर एखादया माईल्ड क्लींजर किंवा ब्लेंडर क्लींजर त्या ब्युटी ब्लेंडर स्पंजवर घालून फक्त फिंगरटीप्सच्या मदतीने हा स्पंज धुवून घ्या.
३. मग गरम किंवा साध्या पाण्याने हा स्पंज धुवून घ्या.
४. हा स्पंज स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका टिश्यू पेपर किंवा स्वच्छ टॉवेलचा वापर घेऊन त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून घ्या.
२. डिप क्लिनिंग (Deep Cleaning) - स्पंज अगदीच खराब झाला असेल तरच त्याला डिप क्लिन करावे. सारखे सारखे डिप क्लिनिंग केल्यास स्पंज खराब होण्याची शक्यता असते. गरज असेल तेव्हाच डिप क्लिनिंग करत जावे.
१. डिप क्लिनिंग करण्यासाठी सर्वात आधी स्पंज ३० ते ६० सेकंद गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे स्पंजमध्ये पाणी जाऊन तो आपोआप फुगून मोठा होईल.
२. फुगून मोठ्या झालेल्या या स्पंजवर सॉलिड किंवा लिक्विड स्वरूपातील क्लींजर घालावे.
३. त्यानंतर आपल्या हातांच्या तळव्यावर या स्पंजला गोलाकार आकारात रगडून घ्या.
४. हा स्पंज वाहत्या पाण्याखाली धरून हातांच्या तळव्यांवर सर्क्युलेशन मोशनमध्ये (गोलाकार आकारात) क्लींजरचा फेस निघून जाईपर्यंत स्वच्छ धुवावा.
५. त्या स्पंजमधून जोपर्यंत क्लींजरचा संपूर्ण फेस निघून जात नाही तोपर्यंत त्याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्या.
६. हातांनी स्पंज दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर टॉवेल किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने हा स्पंज सुकवून घ्या.
३. हीट स्टेराइलाइजेशन (Heat Sterilization) - या ब्युटी ब्लेंडर स्पंजला किमान महिन्यातून एकदा तरी हीट स्टेराइलाइज करून घ्यावे.
१. ब्युटी ब्लेंडर स्पंजमधील बॅक्टेरिया हीट स्टेराइलाइज पद्धतीने सहज काढू शकतो.
२. एका काचेच्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात हा स्पंज पूर्णपणे बुडेल असे करा.
३. या भांड्यावर झाकण न ठेवता भांड ३० सेकंदांसाठी मायक्रोव्हेव करून घ्या.
४. त्यानंतर हे भांड बाहेर काढून स्पंज हाताने दाबून त्यातील सगळे पाणी काढून घ्या.
५. टिश्यू पेपर किंवा टॉवेलच्या मदतीने हा स्पंज व्यवस्थित सुकवून घ्या.