सध्या केसांना कलर करण्याचा ट्रेंड सुरु आहे. कुल आणि फॅशनेबल दिसण्यासाठी बरेच महिला आणि पुरुषवर्ग केसांना हायलाईट अथवा कलर करत आहेत. मात्र, हेच कलर आपल्या केसांसाठी हानिकारक ठरत आहे. काही प्रोडक्ट्स केसांना उत्तम कलर यासह नवी चमक देतात. त्यांची योग्यरीत्या काळजी घेतली तर केसांमधून कलर आणि चमक जात नाही. आज आपण कलर केसांची निगा कशी राखायची यासंदर्भात जाणून घेऊया..
केसांच्या रंगावर संशोधन
2010 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये केसांच्या रंगाबाबत एक संशोधन समोर आले होते. त्यात सांगण्यात आले की, केसांना रोज शॅम्पूने धुतल्यास केसांमधील कलर निघून जाते. कालांतराने केसांमधून रंग जाणे स्वाभाविक आहे. मात्र, केसांवर अधिक प्रमाणावर शॅम्पू लावल्याने केसांवरील रंग निघून जाते. यासह केसांना देखील हानी पोहचवते.
रंगीत केसांची घ्या अशी काळजी
३ दिवस केस धुणे टाळा
एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार केसांना रंग दिल्यानंतर सुमारे ३ दिवस केस धुणे टाळा. रंगीत केसांमध्ये क्युटिकल्स असतात. जे केस धुतल्यानंतर रंग निघून जाते. त्यामुळे आठवड्यातून ३ वेळा केस धुणे टाळा.
कंडिशनरचा वापर
केसांना चांगले पोषण देण्यासाठी त्यांना मॉइश्चराइझ करणे आवश्यक आहे. केवळ रंगीत केसांवरच नव्हे तर सामान्य केसांवरही कंडिशनर नियमितपणे लावावे. केसांमधील ओलावा टिकवून ठेवल्याने ते जास्त काळ हायड्रेटेड राहतात.
पाण्याचे तापमान
तज्ज्ञांच्या मते, आंघोळीचे पाणी खूप गरम असेल, तर क्युटिकल्स उघडतात आणि त्यावर लावलेला रंग फिका पडू लागतो. थंडीतही रंगीत केस सामान्य पाण्याने धुवावेत. यासाठी आपण दुपारची वेळ निवडू शकता.
सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करा
रंगीत केस नेहमी सूर्य किंवा अतिनील प्रकाशापासून संरक्षित केले पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते, केस सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आले तर त्यांचा रंग झपाट्याने फिका पडू लागतो. त्यामुळे बाहेर पडताना केसांना स्कार्फ बांधून बाहेर पडा.