Lokmat Sakhi >Beauty > शाम्पूत तेल मिसळून केसांना लावावं का ? तज्ज्ञ सांगतात, रिल पाहून ‘असं’ करत असाल तर...

शाम्पूत तेल मिसळून केसांना लावावं का ? तज्ज्ञ सांगतात, रिल पाहून ‘असं’ करत असाल तर...

Is it better to add oil into shampoo or not when washing the hair : शाम्पूमध्ये हेअर ऑईल मिक्स करुन लावल्याने केसांचे नाहीसे झालेले सौंदर्य परत येते, पण ते वापरणे योग्य की अयोग्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 03:15 PM2024-06-22T15:15:11+5:302024-06-22T15:32:28+5:30

Is it better to add oil into shampoo or not when washing the hair : शाम्पूमध्ये हेअर ऑईल मिक्स करुन लावल्याने केसांचे नाहीसे झालेले सौंदर्य परत येते, पण ते वापरणे योग्य की अयोग्य ?

Is it better to add oil into shampoo or not when washing the hair Is Adding Oil To Shampoo Good For Hair | शाम्पूत तेल मिसळून केसांना लावावं का ? तज्ज्ञ सांगतात, रिल पाहून ‘असं’ करत असाल तर...

शाम्पूत तेल मिसळून केसांना लावावं का ? तज्ज्ञ सांगतात, रिल पाहून ‘असं’ करत असाल तर...

आपले केस सुंदर, लांबसडक, घनदाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. केसांचे आरोग्य व सौंदर्य दोन्ही चांगले राहावे म्हणून आपण त्यांची खूप काळजी (Hair Care) घेतो. असे असले तरी आजकाल केसांच्या अनेक समस्यांनी बरेचजण हैराण आहेत. केसांच्या या सगळ्या समस्या दूर होऊन केस मजबूत व्हावेत, यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. केसांचे हेअर केअर रुटीन व्यवस्थित फॉलो करूंन आपण केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवू शकतो. हेअर केअर रुटीनमध्ये, केसांना वेळच्यावेळी तेल लावणे, ते शाम्पूने व्यवस्थित धुणे त्यानंतर कंडिशनिंग करणे अशा काही बेसिक गोष्टींचा समावेश असतो(Is Adding Oil To Shampoo Good For Hair).

केस धुण्याआधी आपण केसांना तेलाने मसाज करतो. त्यानंतरच शाम्पूने केस धुतो. केस धुण्यासाठी आपण प्रामुख्याने वेगवेगळ्या शाम्पूचा वापर करतो. परंतु काहीजणांच्या मते, शाम्पूमध्ये तेल मिक्स करुन या मिश्रणाने केस धुतल्यास केस अधिक चांगले दिसतात. तसेच हा उपाय केल्यामुळे केसांच्या अनेक समस्या देखील नाहीशा होतात. परंतु हे कितपत योग्य आहे की अयोग्य ? नवी दिल्लीतील अभिवृत सौंदर्यशास्त्राचे कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचा तज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात(Is it better to add oil into shampoo or not when washing the hair).

शाम्पूमध्ये तेल मिक्स करुन केसांना लावणे योग्य की अयोग्य ?

शाम्पूमध्ये तेल मिक्स करुन केसांना लावण्याची ही पद्धत नवीन नाही. पूर्वी पासूनच काहीजण केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उपाय करत होते. याबाबत कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचा तज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल सांगतात की, आपण शाम्पूमध्ये कॅरियर ऑईल किंवा कोणतेही हेअर ऑईल मिक्स करुन ते केसांना लावू शकतो. केसांसाठी हे खूप फायदेशीर असते. यामुळे केसगळती थांबते आणि केस मजबूत होतात.  शाम्पूमध्ये केसांचे तेल मिसळून ते लावल्याने केस फ्रिजी होण्याची समस्या कायमची दूर होऊ शकते आणि केसांच्या आरोग्यासाठी हा उपाय फायदेशीर मानला जातो. या उपायाचा वापर करताना सर्वप्रथम एका वेगळ्या भांड्यात थोडा शाम्पू व तेल मिक्स करुन ते केसांना लावून पाहावे. जर आपल्या केसांना हा उपाय सूट होत असेल तरच तो करावा, अन्यथा करु नये. 

हेअर स्पा करण्याचे १० फायदे, केस तर सुंदर दिसतीलच पण केसांसाठी ‘महत्वाचे’ लाभ खरे वेगळे...

केसांना लावण्याचे रबरबॅण्ड कळकट झाले म्हणून फेकू नका, ५ टिप्स-रबरबॅण्ड दिसतील नव्यासारखे...

शाम्पूमध्ये हेअर ऑईल मिक्स करण्याचे फायदे :- 

१. स्कॅल्प इचिंग दूर होते :- वातावरणातील धूळ, माती आपल्या स्कॅल्पवर जाऊन चिकटते. यामुळे स्कॅल्पची त्वचा खराब होऊ शकते. त्याचबरोबर स्कॅल्पला सारखी इचिंग होऊ शकते. स्कॅल्पची होणारी इचिंग थांबवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरु शकतो. स्कॅल्पची इचिंग कमी करण्यासाठी रोजमेरी ऑईल शाम्पूमध्ये मिक्स करुन लावल्यास अधिक फायदेशीर ठरते. 

२. स्कॅल्पचे आरोग्य सुधारते :- खोबरेल तेल शाम्पूमध्ये मिसळून लावता येऊ शकते. खोबरेल तेलात असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे स्कॅल्पचे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर रक्ताभिसरण सुरळीत होते. 

३. केसांना पोषण मिळते :- बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसांचे पोषणही संपते. त्याचबरोबर केसांना नियमितपणे शाम्पू मिश्रित तेल लावल्यास केसांचे पोषण होते.

Web Title: Is it better to add oil into shampoo or not when washing the hair Is Adding Oil To Shampoo Good For Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.