Lokmat Sakhi >Beauty > तोंड येणं, तोंडातले लालसर फोड यामुळे खाणं अवघड? ५ घरगुती उपाय- मिळेल आराम

तोंड येणं, तोंडातले लालसर फोड यामुळे खाणं अवघड? ५ घरगुती उपाय- मिळेल आराम

Red Sores Mouth Problems तोंडात फोड, अल्सर याकडे दुर्लक्ष करता कामा नये, डॉक्टरांचाही सल्ला घेणं आवश्यक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 02:41 PM2022-10-31T14:41:43+5:302022-10-31T14:42:08+5:30

Red Sores Mouth Problems तोंडात फोड, अल्सर याकडे दुर्लक्ष करता कामा नये, डॉक्टरांचाही सल्ला घेणं आवश्यक  

Is it difficult to eat because of red sores in the mouth? 5 Home Remedies – Get relief | तोंड येणं, तोंडातले लालसर फोड यामुळे खाणं अवघड? ५ घरगुती उपाय- मिळेल आराम

तोंड येणं, तोंडातले लालसर फोड यामुळे खाणं अवघड? ५ घरगुती उपाय- मिळेल आराम

तोंड येणे, तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे, जिभेला लाल फोड असे त्रास अनेकांना छळतात. यालाच ‘स्टोमॅटायटिस’ किंवा अफ्थरस अल्सर असे देखील म्हणतात. जेव्हा तोंड येते तेव्हा खाणे, पिणे, ब्रश करणे यावेळी त्रास होतो.  तोंड येण्याची कारणे अनेक आहेत. ब्रश करताना अनावधानाने ब्रश हिरड्यांना किंवा ओठांना टोचते. जेवण झाल्यानंतर टूथपिक किंवा अन्य साधने घालणे या कारणांमुळे देखील तोंड येऊ शकते. रासायनिक किंवा अतिउष्ण पदार्थ खाल्ल्यानंतर देखील तोंड येते. कित्येकदा घाईगडबडीत जेवताना दातांमध्ये घास अडकणे असे प्रकार होतंच असतात. त्यामुळे दातांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. या कारणांमुळे देखील तोंड येणे हा त्रास उद्भवतो.

मीठ

मीठ आपल्या जेवणाला चव तर देतेच, पण यासह शरीराच्या निगडीत अन्य कारणांसाठी देखील वापरण्यात येते. मिठाला सोडियम क्लोराईड म्हणूनही ओळखले जाते. तोंड येणे किंवा जिभेवर होणारा त्रास ते कमी करण्यास मदत करते. मिठात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात. सर्वप्रथम एक कप पाण्यात एक चमचे मीठ चांगले मिसळा. त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून अनेक वेळा असे केल्याने तोंडाचे व्रण बरे होतात. आणि काहीसा आराम देखील मिळतो.

दही

दह्यात एंटी-इंफ्लेमेटरी, एंटीबैक्टीरियल आणि एंटीऑक्सीडेंट गुण आहेत जे तोंडातील सूज, तोंडात व्रण येणे यासारखे अनेक आजारांपासून लांब ठेवते. 

लवंग

लवंग या तेलात युजेनॉल नावाचे किफायतशीर गुण आढळते. जे तोंडाच्या निगडीत असलेल्या आजारासंबंधित फायदेशीर ठरते. सर्वप्रथम एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळा. त्यांनतर त्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून २ ते ४ वेळा गुळण्या केल्याने तोंडातील व्रण, आणि तोंडाच्या संबंधित इतर आजार बरे होतात. जोपर्यंत तोंडातील व्रण बरे होत नाही. तोपर्यंत गुळण्या करावे.  

टी- ट्री ऑईल

टी- ट्री ऑईल मध्ये अनेक गुणधर्म असतात. या तेलात टेरपिनन-4 सारखे उपयुक्त गुणधर्म आढळते. जे तोंडातील व्रण कमी करण्यास उपयुक्त ठरले आहेत. यासह यात अनेक ॲण्टी बैक्टीरियल आणि ॲण्टीसेप्टिक गुण आहेत जे तोंडाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळावे. आणि माउथवाॅशप्रमाणे गुळण्या करावे. दिवसातून २ वेळा केल्यास नक्कीच याचा फायदा होईल आणि फरक देखील लवकर जाणवेल. 

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा अनेक कारणांसाठी वापरला जातो. त्याची अल्कधर्मी गुणधर्म तोंडाच्या pH मूल्याचे संतुलन राखण्यास मदत करते. ज्यामुळे जिभेवरील फोड दूर होऊ शकतात. सर्वप्रथम, एक कप पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. या पाण्याने गुळण्या करा.

Web Title: Is it difficult to eat because of red sores in the mouth? 5 Home Remedies – Get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.