बरेच लोकं अंग दुखत असल्यास तेलाने मालिश करतात. यामुळे दुखणे थांबते, आणि स्किनवर नवी चमक येते. काही लोकं शरीर आणि केसांना नियमित तेल लावतात (Hair Oil Tips). पण बरेच लोक केसांना तेल लावणे आवश्यक मानत नाहीत आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. केसांना तेल न लावल्यास केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. केस गळतात आणि टक्कल पडू लागते. त्यामुळे केसांना तेल लावावे (Hair Care Tips).
बरेच लोक रात्री तेल लावतात आणि सकाळी धुतात. पण जर आपल्याकडे रात्रीची वेळ नसेल तर आपण आंघोळीच्या एक तास आधीही केसांना तेल लावू शकता (Hair Loss Problems). यामुळे केस गळणे थांबेल आणि केस मजबूत होतील. पण असाही प्रश्न निर्माण होतो की केस धुण्यापूर्वी तेल लावावे का? यामुळे केसांना कितपत फायदा होतो?(Is it important to oil you hair before shampooing).
केस धुण्यापूर्वी तेल लावण्याचे फायदे
केस गळणे थांबेल
जर आपण रात्री केसांना तेल लावायला विसरले असाल तर, सकाळी धुण्याच्या एक तास आधी लावा. यामुळे केसांना तेलातील पोषण मिळेल. शिवाय केस गळती बऱ्याच अंशी नियंत्रणात राहील. जर आपले केस फार गळत असतील तर, केस धुण्यापूर्वी तेल लावायला विसरू नका. यामुळे केस तुटणे, केस गळणे थांबेल आणि केस मजबूत होतील.
अगदी १० रुपयांत घरीच करा हेअर स्पा; ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा केल्यासारखे चमकतील केस
केस मजबूत होतील
केस धुण्यापूर्वी तेल लावल्याने केस मजबूत होतात. तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे केसांची गळती थांबते. त्यामुळे केस धुण्याच्या एक तास आधी कोणत्याही तेलाने स्काल्पवर मसाज करा. ज्यामुळे तेलातील पोषण केसांना पुरेपूर मिळेल.
केसांची वाढ होते
केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावल्याने केसांची वाढ वेगवान होते. खरंतर, केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते. मुख्य म्हणजे तेल पोर्समध्ये जातात. ज्यामुळे केसांची योग्य वाढ आणि स्काल्पवरील इन्फेक्शन दूर होते. केसांची वाढ योग्यरीत्या व्हावी असे वाटत असेल तर, आंघोळीपूर्वी केसांना तेल लावा.
केस कोरडे होत नाही
आंघोळीपूर्वी केसांना तेल लावल्यानेही केसांना आर्द्रता मिळते. यासाठी आपण केसांना एरंडेल आणि ऑलिव्ह ऑईल लावू शकता. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असतात, जे केसांचे मुळे मजबूत करतात. केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
केस गळून भांग रुंद होत चालला आहे? स्काल्पवर लावा एक खास प्रकारचे पाणी; निरोगी केसांचं रहस्य
केसांना तेल कसे लावावे?
केसांना तेल लावणे खूप फायदेशीर आहे. विशेषतः आंघोळीच्या एक तास आधी केसांना तेल लावावे. यासाठी तेल कोमट गरम करा. नंतर बोटांवर तेल घेऊन स्काल्पवर लावा, आणि मसाज करा. यानंतर केसांनाही तेल लावा. एक तासानंतर, केस सौम्य शाम्पूने धुवा.