'केस' आपले सौंदर्य अधिकच खुलवून आणण्यास मदत करतात. आपल्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांची काळजी घेणं तितकेच महत्वाचे असते. तुम्ही आपल्या केसांची कशी काळजी घेता यावरचं केसांचे आरोग्य आणि सौंदर्य अवलंबून असते. केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले राहण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक असते. केसांना तेल लावल्याने केसांचे योग्य पोषण करुन केस मजबूत केले जातात(Everything You Need to Know About Oiling Your Hair).
केसांना तेल लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. केसांची काळजी घेताना केसांना तेल लावणे आवश्यक असते. पण हे तेल नेमकं कधी लावावं, ओल्या केसांत लावावं की कोरड्या केसांत लावावं असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्यापैकी काहीजणांना ओल्या केसांत तेल लावण्याची सवय असते. परंतु ओल्या केसात असे तेल लावणे योग्य की अयोग्य ? त्याचबरोबर ओल्या केसांत तेल लावण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत याबद्दल दिल्लीच्या डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर चांदनी गुप्ता यांनी अधिक माहिती दिली आहे(Is it ok to apply oil after bath on wet hair).
ओल्या केसांत तेल लावण्याचे फायदे...
१. केसांत ओलावा टिकून राहतो :- ओल्या केसांना तेल लावल्याने केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होत नाहीत. त्याचबरोबर केस तुटण्याची शक्यताही फार कमी असते.
२. फ्रिजीनेस कमी होतो :- ओल्या केसांना तेल लावल्याने केसांच्या गुंता होत नाहीत, त्याचबरोबर केस धुतल्यावर केसांमध्ये फ्रिजीनेस येऊन केस विस्कटल्या सारखे दिसतात, असे केस सेट करण्यासाठी तेल लावणे गरजेचे असते.
३. बॅलेन्स मॉइश्चराइजेशन :- ओल्या केसांना तेल लावल्याने केसांमधील आर्द्रता आणि तेल यांचे योग्य प्रमाणात संतुलन राखले जाते. ज्यामुळे केस हेल्दी दिसतात.
ओल्या केसांना तेल लावण्याचे तोटे...
१. टाळूवर तेल जमा होणे :- ओल्या केसांना तेल लावल्याने आपल्या टाळूवर हे तेल जमा होऊ शकते. त्यामुळे केसांच्या मुळांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि केसगळती वाढू शकते.
२. स्कॅल्प इन्फेक्शन :- ओल्या केसांना तेल लावल्याने टाळूमध्ये ओलावा वाढू शकतो, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पला बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
३. चिकटपणा :- ओल्या केसांना तेल लावल्याने केस अधिक चिकट होतात आणि केस धुण्यास त्रास होतो.
शुगर स्क्रबिंग करताय ? थांबा, त्वचेचे होईल नुकसान, शुगर स्क्रबिंग करण्याचे ४ तोटे...
डर्मेटॉलॉजिस्ट सांगतात केसांना तेल नेमके कधी लावावे ?
डर्मेटॉलॉजिस्ट, डॉ. चांदनी गुप्ता सांगतात की, सर्वात आधी केस थोडे हलकेच सुकवून घ्यावे. त्यानंतर या हलकेच सुकलेल्या केसांवर तेल लावावे. यामुळे केसांमध्ये आर्द्रता आणि तेल यांचे योग्य संतुलन राखले जाते आणि केस निरोगी राहण्यास मदत मिळते.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...
१. योग्य प्रमाणात तेल लावा :- केसांवर तेल लावण्यासाठी तेल योग्य प्रमाणात घेणे गरजेचे असते. जास्त प्रमाणात केसांना तेल लावल्याने केस अधिक चिकट होऊ शकतात.
२. डोक्याला मसाज करा :- तेल लावल्यानंतर डोक्याला मसाज करा, जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल आणि केस मजबूत होतील.
३. तेल लावण्याची योग्य वेळ :- आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावणे केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी पुरेसे असते. यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते निरोगी राहतात.