आजकाल प्रत्येकजण केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करत असतात. कमी अधिक प्रमाणात सगळ्यांनाचं केसांची समस्या सतावते. केसांच्या या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सपासून सुटका मिळावी म्हणून आपण अनेक उपाय करतो. या उपायांपैकी काही उपाय हे घरगुती असतात. हेअर प्रॉब्लेम्स कमी करण्याच्या घरगुती उपायांमध्ये बरेचदा लिंबाचा रस वापरला जातो(Is It Safe to Use Lemon Juice For Hair).
केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअरमास्क, हेअरपॅक घरीच तयार करताना आपण त्यात लिंबाचा रस घालतो. परंतु केस आणि स्कॅल्पसाठी लिंबाचा रस वापरणे कितपत योग्य आहे? तसेच लिंबाचा रस वापरल्याने केसांना नेमका फायदा होतो की केसांचे नुकसान होते. गुरूग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलचे डर्माटॉलॉजिस्ट डॉ. रुबेन भसीन पासी यांनी याबाबतीत अधिक माहिती दिली आहे(Is it safe to apply lemon juice on hair).
१. केसांना लिंबाचा रस लावणे योग्य की अयोग्य ?
डॉ. रुबेन भसीन पासी यांच्या मते, केसांना लिंबू लावण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. लिंबाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक अॅसिड आणि व्हिटॅमिन 'सी' असते, ज्यामुळे स्कॅल्प निरोगी राहण्यास मदत होते आणि केसांतील कोंडा कमी होण्यास मदत देखील होते. याव्यतिरिक्त, केसांमधील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकून ते नैसर्गिकरित्या स्कॅल्प स्वच्छ करण्याचे मुख्य काम करतात. परंतु लिंबाच्या रसामध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते थेट केसांवर किंवा स्कॅल्पला लावल्याने स्कॅल्पच्या त्वचेची जळजळ होऊन त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो, विशेषत: जर तुमची त्वचा अधिक जास्त सेंन्सेटिव्ह असेल तर असे होऊ शकते. त्यामुळे केस आणि स्कॅल्पसाठी जास्त प्रमाणात लिंबाच्या रसाचा वापर केल्याने केस कमजोर होतात, यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक वाढते. इतकेच नाही तर लिंबाच्या रसाच्या प्रकाशसंवेदनशीलतेमुळे, केसांना लावल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे केस पांढरे होऊ शकतात किंवा स्कॅल्पला अधिक जास्त जळजळ होऊ शकते.
चेहऱ्यावर फिरतात गोगलगायी! स्नेल फेशियचा हा नवा ट्रेंड पाहिला का, चक्क गोगलगाय करते फेशियल...
२. केसांवर लिंबाचा रस लावण्याची योग्य पद्धत कोणती ? (How to apply lemon on hair)
लिंबाचा रस थेट केसांवर न लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याउलट, जर केसांवर लिंबाचा रस लावायचाच असेल तर तो पाण्यांत मिक्स करून मगच केसांवर लावावा. याचबरोबर, लिंबाच्या रसात दही, मध यांसारखे पदार्थ मिसळून मगच लिंबाचा रस केसांवर लावावा. केसांसाठी लिंबाच्या रसाचा वापर करताना तो कमी किंवा मर्यादित प्रमाणांतच करावा. केसांवर लिंबाचा रस लावला असताना शक्यतो सूर्यप्रकाशात जाणे टाळा. कोणत्याही हेअरपॅक, हेअरमास्कमध्ये लिंबाचा रस मिसळून त्याचा वापर केसांसाठी केला असता थोड्यावेळानंतर केसांवरील हेअरमास्क स्वच्छ धुवून घ्या. स्कॅल्प आणि केसांवरील हेअरमास्क संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या. केस स्वच्छ धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे असते. यामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, खाज येणे, त्वचा लाल होणे यांसारख्या समस्यांचा त्रास जाणवणार नाही.
रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!
नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...
केसांना लिंबाचा रस लावण्याचे फायदे :-
१. लिंबामध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म कोंड्याची समस्या कमी करतात.
२. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. ३. लिंबात असणारे व्हिटॅमिन 'सी' केसांचे छिद्र मजबूत करते.
४. लिंबाच्या रसामध्ये असलेले नैसर्गिक क्लिनर घटक केसांमधील घाण आणि अतिरिक्त तेल कमी करतात.
५. लिंबाचा रस स्कॅल्पवर लावल्याने त्वचेची पीएच पातळी चांगली राहते.
६. लिंबाचा रस लावल्याने केस गळणे आणि तुटण्याची समस्या कमी होते.
लिंबाचा रस केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करू शकतो, परंतु लिंबाचा रस थेट स्कॅल्पवर लावणे टाळा आणि मर्यादित प्रमाणातच त्याचा वापर करा.