Korean Beauty Tips For Skin : तारुण्यात आल्यानंतर अनेकजण चेहऱ्यावरूल मुरुमे आणि पिंपल्समुळे हैराण आहेत. स्ट्रेस, बाहेरचे प्रदूषण, जंक फूड आणि चेहऱ्याची नीट काळजी न घेतल्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. (korean skin care routine steps) सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या त्वचेवर अनेक महागड्या उत्पादनाचा वापर देखील करतो. नियमितपणे चेहऱ्याची काळजी घेऊन सुद्धा आपल्याला हवा तसा रिजल्ट मिळत नाही. (korean beauty tips)
हल्ली जगभरात कोरिअन स्किन केअरचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. कोरिअन पद्धतीचा वापर करुन त्वचा आणखी सुंदर कशी करायला हवी याविषयीची माहिती सोशल मीडियावरुन आपल्याला सहज मिळते. (korean beauty tips for glowing skin in marathi) परंतु, भारतीय लोकांनी खरोखर कोरिअन स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवे का? (korean beauty tips for skin whitening)यामुळे आपली त्वचा तुकतुकीत किंवा तजेलदार होते का? जर तुम्ही देखील कोरिअन स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा.
त्वचेची काळजी कशी घ्याल?
भारतीय लोकांची स्किन साधारपणे तेलकट आणि कोरडी असते. इथल्या हवामानातील बदलाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि पिगमेंटेशन सारख्या त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेमध्ये मेलिनिनचे प्रमाण अधिक असल्यामुळे कोरिअन स्किन केअर रुटीन आपल्यावर त्याचा प्रभाव अधिक करत नाही.
कोरिअन स्किन केअर त्वचेसाठी किती फायदेशीर?
- कोरिअन स्किन केअरमध्ये आपल्या त्वचेच्या हायड्रेशनवर अधिक भर दिला जातो. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा डिहायड्रेट होते. ज्यामुळे ती कोरडी पडायला सुरुवात होते. कोरिअन उत्पादनामुळे त्वचेला चांगल्या प्रकारचे मॉइश्चरायझर मिळते.
- कोरिअन स्किन केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरते ती सनस्क्रिन. सनस्क्रिनमुळे उन्हाच्या अतिनिल किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते.
- तसेच कोरिअन स्किन केअरमध्ये वापरले जाणारे घटक हे अधिक सौम्य असतात. यामुळे त्वचेला जळजळ किंवा ऍलर्जीपासून वाचवण्यास मदत होते.
- या घटकांमध्ये spf30 आणि spf50, व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड सारख्या वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तसेच चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.
-
या गोष्टी कायम लक्षात ठेवाल!
- कोणतेही उत्पादने वापरण्यापूर्वी त्याची व्यवस्थित माहिती घ्याल. काही उत्पादनांमध्ये अल्कोहोल किंवा सुंगधीत द्रव्याचा वापर केला जातो. जे त्वचेसाठी अधिक हानिकारक ठरु शकते.
- भारतातील हवामान हे कोरियाच्या हवामानापेक्षा अधिक वेगळे आहे. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात वापरल्या क्रिम्समुळे ऍलर्जी होऊ शकते.
- नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. ज्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही.