Join us  

ड्राय स्किन-केस गळतीला वैतागलात? आंघोळीच्या पाण्यात टाका चमचाभर मीठ, मग पाहा जादू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 11:16 AM

Is Salt Water Good for Your Hair and Skin: हिवाळ्यात ड्राय स्किन, केसात कोंडा, केस गळतीची समस्या निर्माण होतेच, यावर एकच उपाय-मीठ..

हिवाळ्यात अनेक समस्या सुरू होतात. जसे त्वचेचा कोरडेपणा, खाज सुटणे, त्वचा पांढरी होणे इत्यादी. याशिवाय केस गळणे, कोंडा होणे आदी समस्याही उद्भवतात. केस गळतीमागे अनेक कारणे असू शकतात. बहुतांश वेळी पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळतात. किंवा केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केसांची गळती थांबत नाही. त्यामुळे हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

थंडीमुळे त्वचेतील आर्द्रता शोषली जाते. तसेच बाहेरच्या कोरड्या हवेमुळे स्काल्प डिहायड्रेट होते. कोरडे केस आणि कोरडे टाळू या दोन्हीमुळे केस तुटणे, पातळ होणे आणि केस गळण्याची समस्या निर्माण होते. पण यावर उपाय म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यात मीठ घालून आंघोळ करू शकता. याचा फायदा फक्त केस आणि त्वचा दोघांना होतो(Is Salt Water Good for Your Hair and Skin).

केसांसाठी उपयुक्त

मिठामुळे केसांशी संबंधित सर्व समस्या कमी होऊ शकतात. मिठाच्या पाण्यामुळे टाळूच्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे रक्त प्रवाह वाढतो. शिवाय स्काल्पची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांमधील अतिरिक्त तेल, कोंडा, केस गळतीची समस्या सुटते.

हिवाळ्यात केसांना मेहेंदी लावली तर तब्येत बिघडते? मेहेंदी भिजवतानाच मिसळा ४ गोष्टी, केसांना सुंदर रंग

त्वचेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात अनेक वेळा स्वच्छतेचा अभाव आणि ओलसर कपड्यांमुळे अंगावर पुरळ उठणे, खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मीठामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. कोमट पाण्यात मीठ मिसळल्याने त्वचेवर असलेले बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात. यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो.

चेहऱ्यावर येते चमक

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात स्किनची चमक कमी होते. कोमट पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेली घाण काढून टाकल्याने त्वचा उजळ होते.

टाचांना भेगा? २ रुपयांची मेणबत्ती आणि चमचाभर मोहरी तेलाचा सोपा उपाय, दुखऱ्या टाचा होतील बऱ्या

स्ट्रेस होतो दूर

कोमट पाण्यात मीठ मिसळल्याने मानसिक ताणही कमी होतो. कोमट पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो, ज्यामुळे थकवा दूर होतो.

टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीकेसांची काळजीत्वचेची काळजी