बहुतांश महिलांची प्रायव्हेट पार्टची त्वचा काळवंडते. प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणं आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. मात्र, अतिरेकही करु नये. काळवंडलेल्या नाजूक जागेवर नाही ते लोशन्स लावून भलते उपाय करु नये. त्यामुळे रॅश येऊन इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतोच. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) ट्रस्टेड यांच्या मते, त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी इंजेक्टेबल स्किन लाइटनिंग उत्पादने वापरण्याची गरज नाही. ते उत्तम काम करतात असा पुरेसा पुरावा देखील नाही, आरोग्याला देखील हानिकारक ठरू शकतात. प्रायव्हेट पार्टची जागा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स न वापरल्यासच उत्तम. मात्र काळपटपणा कमी करण्यासाठी काही उपाय करता येतील. मात्र तरीही डॉक्टरांचा सल्ला न घेता त्वचेवर प्रयोग करु नका.
पपई
पपईमध्ये ‘पपाइन’ नावाचं एन्झाईम असते. या एन्झाईममुळे काळवंडलेल्या त्वचा उजळण्यास मदत होते. शिवाय मृत त्वचेच्या समस्याही कमी होतात. पपईची पेस्ट काळवंडलेल्या त्वचेवर अर्धा तास लावून ठेवावी. यानंतर कोमट पाण्यानं त्वचा स्वच्छ करावी.
बटाटा
बटाटा कापून त्याचा रस काढून घ्या. हा रस प्रायव्हेट पार्टवर लावा. किंवा बटाटा मिक्समध्ये वाटून त्याची पेस्ट लावू शकता. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी काळवंडलेल्या त्वचेवर लावून ठेवावी. यानंतर कोमट पाण्यानं प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा.
साखर
एका बाऊलमध्ये लिंबाचा रस, एक चमचा साखर आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करा. हलक्या हाताने हे मिश्रण मांडीच्या आतील भागात लावा. स्क्रब सुकल्यानंतर आतील भाग स्वच्छ पाण्याने धुवा.
चंदन पावडर
काळपट पडलेल्या त्वचेवर रामबाण उपाय म्हणून चंदन पावडर काम करते. चंदन पावडरमुळे हायपरपिगमेंटेशनची समस्या कमी होते. एक चमचा चंदन पावडरमध्ये अर्ध्या लिंबूचा रस आणि गुलाब पाणी अशी मिश्रण तयार करून घ्या. ही पेस्ट काळ्या पडलेल्या त्वचेवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं त्वचा स्वच्छ करा.
दूध
दुधातील पौष्टीक घटक फक्त शरीरासाठी नाही तर, त्वचेसाठी देखील किफायीतशीर आहे. एका वाटीमध्ये दूध घ्या. काळ्या पडलेल्या जागेवर कापसाच्या मदतीनं कच्चे दूध लावा. किंवा हलक्या हातांनी त्या जागेवर दुधानं मसाज करा. १५ मिनिटांनी प्रायव्हेट पार्ट कोमट पाण्यानं स्वच्छ करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा. याने काळपटपणा कमी होण्यास मदत होईल.