Join us  

केस कायम चिप्पू तेलकट असतात? केस धुताना पाण्यात फक्त ३ गोष्टी घाला, केस होतील सुळसुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2023 6:04 PM

Hair Care Tips हिवाळ्यात केस अधिक चिकट - तेलकट होतात. यासाठी घरगुती उपाय करतील मदत

हिवाळ्याच्या महिन्यात तेलकट आणि चिकट केसांच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त असतात. थंडीच्या दिवसात दररोज केस धुणे शक्य होत नाही. तेलकट केस हे कोणत्याही मोठ्या समस्येचे कारण नसून ते खूप वाईट आणि कुरूप दिसतात. यामुळे आपला एकूण लूक पूर्णपणे खराब होऊन जातो. 

अशा परिस्थितीत, बहुतेक लोक ड्राय शॅम्पूचा वापर करतात, ज्यामध्ये उपस्थित रसायने केसांसाठी खूप हानिकारक आहेत. आपल्याला जर तेलकट केसांपासून सुटका हवी आहे तर, घरगुती उपायांचा वापर करून पाहा. ४ नैसर्गिक गोष्ट तेलकट आणि चिकट केसांपासून मुक्ती देईल.

लिंबाचा रस उपयुक्त

तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका हवी असल्यास लिंबाचा रस मदत करेल. हा रस केसांमधला चिकटपणाच नाही तर केसांना चमकदार आणि मुलायम बनविण्यास मदत करेल. हिवाळ्यात केस धुताना पाण्यात लिंबू पिळून त्याचा रस वापरा. असे केल्याने केस जास्त काळ तेलकट राहत नाहीत यासह चमकदार दिसतात.

पाण्यात एक झाकण बिअर मिसळा

तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका हवी असेल तर, बिअरचा वापर करा. पाण्यात एक झाकण बिअर मिसळा त्यानंतर केस धुवा, थोड्या वेळा नंतर पुन्हा सध्या पाण्याने केस धुवा. बिअरने केस स्वच्छ, मऊ आणि सुंदर दिसतात.

तांदळाचं पाणी मिसळा

बहुतांश लोकं हेल्दी केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्याने केस जास्त काळ स्वच्छ आणि तेलविरहित राहतात. यासाठी तुम्हाला तांदूळ स्वच्छ पाण्यात भिजवावे लागेल आणि काही तासांनी ते पाणी गाळून केस धुवावेत. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्याने केसांना आवश्यक पोषण मिळतात. यासह कोंड्याची समस्याही दूर राहते.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी