Lokmat Sakhi >Beauty > कोरड्या बेजान केसांचा पार झाडू झालाय, मऊ केस हवे तर त्यांना ‘बटर’ लावा!

कोरड्या बेजान केसांचा पार झाडू झालाय, मऊ केस हवे तर त्यांना ‘बटर’ लावा!

केसांच्या पोषणासाठी शीआ बटर हा उत्तम पर्याय मानला जातो. आतापर्यंत शीआ बटर हे केवळ त्वचेसाठीच उपयुक्त मानलं जात होतं. पण शीआ बटरमधील घटक हे त्वचा आणि केस दोन्हींच्या पोषणासाठी उत्तम असतात असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 05:13 PM2021-05-21T17:13:27+5:302021-05-21T17:33:10+5:30

केसांच्या पोषणासाठी शीआ बटर हा उत्तम पर्याय मानला जातो. आतापर्यंत शीआ बटर हे केवळ त्वचेसाठीच उपयुक्त मानलं जात होतं. पण शीआ बटरमधील घटक हे त्वचा आणि केस दोन्हींच्या पोषणासाठी उत्तम असतात असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात.

It is beneficial to use shea butter to soften dry hair ... How to apply this shea butter to hair? | कोरड्या बेजान केसांचा पार झाडू झालाय, मऊ केस हवे तर त्यांना ‘बटर’ लावा!

कोरड्या बेजान केसांचा पार झाडू झालाय, मऊ केस हवे तर त्यांना ‘बटर’ लावा!

Highlightsशीआ बटरचा पोत हा क्रिमी असतो. खपल्या निघणाऱ्या , खाज येणाऱ्या टाळूसाठी शीआ बटर म्हणूनच उपयुक्त असतं.हेअर ब्युटीमधे केसांना सौंदर्य देण्यासाठी उष्णता देणारी मशीन्स वापरली जातात. या उष्ण यंत्रांचा परिणाम केसांवर होऊन पुढे केसांचं नुकसान होतं. हे नुकसान टाळंयासाठी शीआ बटरचा उपयोग होतो.सूर्याच्या अती नील किरणांपासून केसांचं रक्षण करण्यासाठी शीआ बटरमधे एसपीएफ हा घटकही असतो.

केसाच्या सौंदर्यात अडथळे आणणाऱ्या अनेक समस्यांना आपण नेहेमीच तोंड देत असतो. कोरडे केस, कोंडा, केसांना उंदरी लागणं , केसांना दोन तोंड फुटणं अशा अनेक समस्यांसाठी शाम्पू, कंडिशनरमधून तात्पुरते उपाय शोधले जातात. पण काही दिवसांनी याच समस्या पुन्हा पुन्हा जाणवायला लागतात. याचाच अर्थ केसांना पोषक घटक नीट मिळत नाही असा होतो. केसांच्या पोषणासाठी शीआ बटर हा उत्तम पर्याय मानला जातो. आतापर्यंत शीआ बटर हे केवळ त्वचेसाठीच उपयुक्त मानलं जात होतं. पण शीआ बटरमधील घटक हे त्वचा आणि केस दोन्हींच्या पोषणासाठी उत्तम असतात असं सौंदर्य तज्ज्ञ सांगतात.

शीआ बटर हे शीआ नावाच्या शेंगदाण्यासारख्या घटकापासून तयार होतं. पश्चिम आफ्रिकेत कॅरिटे नावाच्या झाडावर हे शेंगदाण्यासारखे शीआ नटस येतात त्यांच्या अर्कापासून शीआ बटर तयार होतं. अनेक शतकांपासून आफ्रिकेतल्या घराघरात शीआ बटर हे पदार्थात, त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाममधे, पारंपरिक औषधांमधे आणि केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमधे केला जातो. आता शीआ बटर हे केवळ आफ्रिकेतच नाहीतर त्याच्यातील गुणधर्मांमुळे त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी जगभरात केला जातो.

शीआ बटरचे फायदे

- शीआ बटरचा पोत हा प्रामुख्याने क्रिमी असतो. खपल्या निघणाऱ्या , खाज येणाऱ्या टाळूसाठी शीआ बटर म्हणूनच उपयुक्त असतं. शीआ बटरमधील दाहविरोधी गुणधर्मामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होतो. शीआ बटर हे टाळूमधे सहज शोषलं जातं.

- हेअर ब्युटीमधे केसांना सौंदर्य देण्यासाठी उष्णता देणारी मशीन्स वापरली जातात. इतकंच नाहीतर केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरने पटकन सुकवले जातात. या उष्ण यंत्रांचा परिणाम केसांवर होऊन पुढे केसांचं नुकसान होतं. हे नुकसान टाळंण्यासाठी शीआ बटरचा उपयोग होतो. शीआ बटरमुळे केसांवर एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार होतं जे केसांचं नुकसान होण्यापासून केसांचा बचाव करतं. यासाठी केसांवर हिट टूलचा वापर करण्याआधी थोडं शीआ बटर हातावर घेऊन ते केसांवर लावावं.

- केसांना उंदरी लागते, दोन तोंड फुटतात तेव्हा थोडे केस कापून तात्पुरती ही समस्या सोडवली जाते. त्यापेक्षा केसांना आवश्यक की पोषक घटक देऊन केसांना या समस्येशी लढण्याइतकं बळकट करणं हा उत्तम उपाय. शीआ बटर जेव्हा केसांना लावलं जातं तेव्हा केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांना पोषक तत्त्वं मिळतात. त्याचा फायदा केस सूंदर दिसण्यास होतो. केस धुतल्यानंतर केसातलं मॉश्चर / आर्द्रता कमी होते. म्हणून केस धुतल्यानंतर शीआ बटर वापरल्यास केसात मॉश्चर टिकून राहातं.

- शीआ बटर हे नैसर्गिक कंडिशनर सारखं काम करतं. कंडीशनर आणि मॉश्चराइजर या दोन्ही बाबी शीआ बटरमुळे केसांना मिळतात. त्यामुळे शीआ बटरच्या वापरानं केस मऊसूत होतात.

- सूर्याच्या अति नील किरणांपासून केसांचं रक्षण करण्यासाठी शीआ बटरमधे एसपीएफ हा घटकही असतो. उन्हात जायचं असेल तर थोडं शीआ बटर हे विरघळवून घ्यावं. आणि हलक्या हातानं ते केसांना लावावं. यामुळे एक हलका कोट केसांवर तयार होतो जो सूर्याच्या अति नील किरणांचा केसांवर वाईट परिणाम होण्यापासून रोखतो.
- उष्णतेमुळे केसांच्या मुळांचं नुकसान होतं. त्याचा परिणाम म्हणजे केस कोरडे होऊन खाज सुटते. हे टाळण्यासाठी थोडं विरघळलेलं शीआ बटर आपण नेहेमी वापरत असलेल्या सीरममधे एकत्र करावं. आणि ते केसांना लावावं.
- अती कोरडे केस असतील तर शाम्पू केल्यानं ते खूपच कोरडे होतात. यासाठी शाम्पू झाल्यानंतर थोडं शीआ बटर हे कंडिशनरमधे घालून ते केसांना लावावं. पाच मिनिटं ठेवून केस धुवावेत.
- शीआ बटर जर अति प्रमाणात केसांना लावलं तर केस खूप तेलकट-मेणचट दिसतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केस धुतल्यानंतर शीआ बटर केसांना लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

शीआ बटर डीप कंडिशनिंग हेअर मास्क 
 यासाठी एक मोठा चमचा शीआ बटर, एक मोठा चमचा खोबऱ्याचं तेल, एक चोटा चमचा अर्गन ऑइल आणि लव्हेण्डर किंवा रोजमेरी, पेपरमिण्ट यापैकी आवडत्या इसेंन्शिअल ऑइलचे काही थेंब एवढंच लागतं   
एका छोट्या भांड्यात, एक चमचा शीआ बटर, दोन चमचे खोबरेल तेल घेऊन ते आधी विरघळून घ्यावं ते थंड होवू द्यावं. मग त्यात एक चमचा अर्गन ऑइल, इसेंन्शिअल ऑइल घालावं. हॅण्ड मिक्सरनं तीन ते पाच मिनिटं हे मिश्रण घोळून घ्यावं. यामुळे एक क्रीमी मिश्रण तयार होतं. हे मिश्रण केसांवर लावावं. मग केसांवरुन कंगवा फिरवावा. हा पॅक अर्धा तास ठेवावा. आणि मग केस शाम्पू लावून धुवावेत. कंडीशनर लावावं. हा मास्क आठवड्यातून एकदा लावावा.

Web Title: It is beneficial to use shea butter to soften dry hair ... How to apply this shea butter to hair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.