Join us  

डोक्यात सारखी खाज येते- केसांमधून दुर्गंधही येतो? २ सोपे उपाय, मात्र सतत खाज येण्याचं धोक्याचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 7:33 PM

How To Reduce Itching In Scalp: कधी कधी डोक्यात खूपच खाज येते. मग अशावेळी चारचौघांत सारखं डोकं खाजवायलाही लाज वाटते. म्हणूनच बघा त्यावरचा उपाय. (Simple hair care tips)

ठळक मुद्देज्या लोकांना डोक्यात सतत खाज येते, त्यांच्या केसांतून नेहमीच दुर्गंधही येत असतो. या दोन्ही गोष्टी केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगल्या नाहीत.

उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा मग हिवाळा असो... काही जणांना डोक्यात सतत खाज येते. खाज येण्याचं एक कारण म्हणजे डोक्यात उवा असणं. पण काही जणांच्या डोक्यात उवा नसतात, तरी सतत डाेकं खाजवतं. अशावेळी चारचौघांत बसल्यावर डोकं सतत खाजवायला खूप लाज वाटते. शिवाय खाजवून खाजवून डोक्यात जखमा होतात, तो त्रास वेगळाच. ज्या लोकांना डोक्यात सतत खाज येते (How to reduce itching in scalp), त्यांच्या केसांतून नेहमीच दुर्गंधही येत असतो. या दोन्ही गोष्टी केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगल्या नाहीत. म्हणूनच हे काही उपाय करून बघा. डोक्यातली खाजही कमी होईल आणि केसांमधून दुर्गंधही येणार नाही (Remedies for itchy scalp and bad smell from hair).

 

डोक्यात सतत खाज येत असेल तर उपाय....१. बेकिंग सोडाडोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला खूप जास्त बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल तर डोक्यात खाज येते. याच इन्फेक्शनमुळे मग केसांमधून घाण वासही येऊ लागतो.

निर्माल्याची फुलं फेकू नका, पाण्यातही टाकू नका!- करा निर्माल्याच्या फुलांचा सुगंधी धूप घरच्याघरी

त्यामुळे स्काल्पला झालेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी २ टेबलस्पून दही घ्या. त्यात २ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि केसांच्या मुळांशी लावा. १५ ते २० मिनिटांनी केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास महिना भरातच बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन कमी होईल.

 

२. लिंबाचा रसकेसांमधला कोंडा म्हणजे एकप्रकारचं बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनच आहे. हा त्रास कमी करायचा तर लिंबू खूप जास्त उपयोगी ठरतं. एका वाटीत लिंबाचा रस २ टेबलस्पून घ्या. १ टेबलस्पून खोबरेल तेल टाका.

फक्त १ मिनिटाचा १ उपाय नियमित करा; पाठदुखी थांबेल- पोटावरची चरबीही होईल कमी- जॉ लाईनही दिसेल परफेक्ट

आता या मिश्रणाने केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा किंवा कापसाने हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. डोक्याच्या त्वचेवर अजिबात जोरजोरात चोळू नका. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी