केसांमध्ये कोंडा, उवा, स्काल्पवर घाम, त्वचा कोरडी, केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर, अशा अनेक कारणांमुळे डोक्यावर खाज सुटते. काहीवेळेला खाजवून स्काल्पवरील त्वचा रखरखीत होते. सर्वांसमोर डोक्याला खाजवणे ही फार लाजिरवाणी बाब होऊन जाते. समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करेल, असा प्रश्न पडतो.
डोक्याला खाज सुटली की, कशातच मन लागत नाही. लक्ष विचलित होते, ज्यामुळे आपले काम अर्धवट राहते. यासंदर्भात, त्वचारोग व केसतज्ज्ञ डॉ.अमित बंगिया म्हणतात, ''या समस्येला नॉक्टर्नल प्रुरिटस म्हणतात. ज्याला ही समस्या आहे, त्याला रात्रीच्या वेळी त्वचेवर खाज सुटते. ही खाज शरीराच्या कोणत्याही भागावर उठू शकते. टाळू नेहमीच उबदार असल्यामुळे तिथे जास्त खाज सुटते''(Itchy Scalp: Causes, Treatments, and Prevention).
घाम येणे
प्रदूषणामुळे नेहमी डोक्यावर धूळ साचते. सध्या उन्हाळा सुरु आहे, घाम येतो. ज्यामुळे रात्री झोपताना टाळूवर प्रचंड खाज सुटते.
महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू
शरीराच्या तापमानात बदल
सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, शरीराचे तापमान नेहमी बदलत राहते. अनेक वेळा काही लोकांच्या शरीराचे तापमान रात्रीच्या वेळी वाढते, त्यामुळे त्वचेवर खाज सुटते.
हार्मोनल असंतुलन
रात्रीच्यावेळी, एंटी इंफ्लामेटरी हार्मोनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे त्वचेवर सूज येते आणि खाज सुटू लागते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आंबट पदार्थ खाऊ नयेत.
केसांत उवा लिखा
केसांत उवा लिखा झाल्यानेही डोक्यात खाज सुटते.
रंग खेळायला जाल पण केसांचे काय? ५ गोष्टी विसरला तर वर्षभर केस राहतील खराब...
उपाय काय?
खोबरेल तेलात ऑलिव्ह ऑईल मिसळून गरम करा. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावून मसाज करा.
टाळूला गुलाबपाणीही लावू शकता. गुलाब पाण्यात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. गुलाबजल लावून टाळूवर हलका मसाज करा.
जर आपल्याला स्ट्रेस असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा.
केसांना तेल लावायलाच हवे का? तेल लावल्याने केस सुंदर होतात की जास्त गळतात? - पाहा खरं काय..
पलंग स्वच्छ ठेवा, दर ३ ते ४ दिवसांनी उशाचे कव्हर बदला.
आठवड्यातून दोनदा केस धुवावेत, कारण टाळूवर घाण साचल्यावर केसांना खाज सुटते.
केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल तर, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अँटी डँड्रफ शॅम्पू आणि घरगुती उपाय वापरून पाहावे.