Lokmat Sakhi >Beauty > नितळ त्वचा-काळेभोर केस, शालिनी पासीसारखा लूक हवा? करा हा १ घरगुती उपाय तातडीने

नितळ त्वचा-काळेभोर केस, शालिनी पासीसारखा लूक हवा? करा हा १ घरगुती उपाय तातडीने

'I've Never Coloured My Hair...' Shalini Passi Shares Her Haircare Routine and beauty Secrets : श्रीमंत शालिनी पासी निखळ सौंदर्यांसाठी खाते १ चमचा 'ही' पिवळी गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2024 07:03 PM2024-11-19T19:03:12+5:302024-11-19T19:07:49+5:30

'I've Never Coloured My Hair...' Shalini Passi Shares Her Haircare Routine and beauty Secrets : श्रीमंत शालिनी पासी निखळ सौंदर्यांसाठी खाते १ चमचा 'ही' पिवळी गोष्ट..

'I've Never Coloured My Hair...' Shalini Passi Shares Her Haircare Routine and beauty Secrets | नितळ त्वचा-काळेभोर केस, शालिनी पासीसारखा लूक हवा? करा हा १ घरगुती उपाय तातडीने

नितळ त्वचा-काळेभोर केस, शालिनी पासीसारखा लूक हवा? करा हा १ घरगुती उपाय तातडीने

शालिनी पासी (Shalini Passi). एक सुंदर आणि ग्लॅमरस चेहरा (Beauty Secrets).  तिची आलिशान जीवनशैली आणि आलिशान घराची छायाचित्रे आपण पहिलेच असतील. शालिनी पासी सध्या 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज' या रिॲलिटी टीव्ही शोमुळे चर्चेत आहे (Hair care Tips). ती उत्कृष्ट राज्यस्तरीयवर जिम्नॅस्ट आहे. 'माय आर्ट शालिनी' आणि 'शालिनी आर्ट फाउंडेशन'ची मालकीण आहे. शालिनी पासीला पाहिल्यावर तुम्ही निश्चित तिच्या स्किनचं कौतुक केलं असेल. पन्नाशी गाठणारी शालिनी अजूनही तिशीतली दिसते कशी? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.

नुकतंच तिने एका मुलाखतीत तिच्या ब्यूटी सिक्रेट्सबद्दल माहिती दिली. शिवाय केसांची राखण्यासाठी ती काय वापरते, याबद्दलही तिने सांगितले. शालिनीच्या सौंदर्यामागचं रहस्य काय? पाहूयात('I've Never Coloured My Hair...' Shalini Passi Shares Her Haircare Routine and beauty Secrets).

नैसर्गिक उत्पादनांचा वापर


- शालिनी सांगते की ती तिच्या केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उत्पादने वापरते. केस धुण्यासाठी ती रीठा आणि आवळा वापरते. यासाठी आवळा आणि रीठा एक दिवस भिजत ठेवा. यानंतर दोन्ही गोष्टींची पेस्ट बनवून केसांना लावा. शालिनी पासी म्हणाल्या की हे केस निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

- केसांना तेल लावण्यासाठी शालिनी खोबरेल तेल वापरते. यामुळे केसांना पोषण मिळते. शिवाय केस काळेभोर आणि दाट दिसतात.

- शालिनी शक्यतो स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट करत नाही. तसेच शालिनी कोणत्याही प्रकारचे हेअर स्प्रे वापरत नाही.


- शालिनी नेहमी हाय पोनी घालते. तिची ही एक सिग्नेचर स्टाईल आहे. ज्यामुळे ती क्लासी दिसते. कारण त्यात कमीत कमी केसांची उत्पादने वापरली जातात.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

- याव्यतिरिक्त शालिनी तूप खाते. पामध्ये फॅटी ॲसिड्स आढळतात, जे त्वचेसाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या इत्यादीही कमी होतात. 

Web Title: 'I've Never Coloured My Hair...' Shalini Passi Shares Her Haircare Routine and beauty Secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.