प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस तिच्या फॅशनसाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची उंची, देखणा चेहरा, केस, फिगर आणि मुख्य म्हणजे तिची नितळ त्वचा तरुणांसोबतच तरुणींनाही चकीत करते. प्रत्येकीला आपली त्वचा नितळ असावी, आपणही एखाद्या अभिनेत्रीइतके सुंदर दिसावे असे वाटेत. पण त्वचेवरील डाग, पुरळ, खड्डे यांमुळे आपण अडचणीत येतो. सणावाराला किंवा बाहेर एखाद्या कार्यक्रमाला जाताना साधासा मेकअप करणेही अनेकींना जमत नाही. पण काही सोप्या टिप्स घेतल्या तर आपणही सुंदर दिसू शकतो आणि राहू शकतो. जॅकलिनने नुकतेच तिने एका सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रॅंडसोबत फोटोशूट केले. यानंतर तिने मेकअपच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या. पाहूयात काय म्हणते ती...
१. मेकअपपेक्षा तुमच्या आतील सौंदर्य सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे व्हायचे आहे आणि तुम्ही स्वत:ला दुसऱ्यांसमोर जसे सादर करु इच्छिता तो मेकअप असतो.
२. मेकअपसोबत माझी सर्वात जुनी आठवण म्हणजे सगळ्या मुलींना ज्याप्रमाणे लहानपणी आपल्या आईचे मेकअपचे सामान वापरायला आवडते. त्याचप्रमाणे मला माझ्या आईची लिपस्टीक लावायला आवडायची.
३. आपल्या नितळ त्वचेबाबत सांगताना ती म्हणते त्वचेसाठी मी कमीत कमी उत्पादने वापरते. बेडवर जाण्याआधी मी न विसरता मेकअप काढते. कारण मेकअप तसाच राहीला तर त्वचा कोरडी होऊ शकते. मी घराच्या बाहेर पडताना कायम सनस्क्रीन लोशन लावते. विशेषत: शूटींगसाठी बाहेर असताना मी दर दोन ते ३ तासांनी सनस्क्रीन लोशन लावते.
४. तुमच्या आतील सुंदरता हीच खरी सुंदरता असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी आरोग्यदायी पदार्थ खाते आणि जास्तीत जास्त पाणी पिते.
५. माझी त्वचा वातावरणानुसार बदलते. पण त्वचेसाठी मी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट करते ती म्हणजे मॉइश्चरायझर वापरणे. मॉइश्चरायझरमुळे तुमची त्वचा चमकदार होऊ शकते. पण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे अनेकांना लक्षात येत नाही.
६. माझ्या बॅगमध्ये कायम सनस्क्रीन लोशन, लिपस्टीक, मेकअर फिक्सर, लिप बाम आणि नेलपेंट या ५ गोष्टी आवर्जून असतात.
७. मेकअपच्या बाबतीत मी कायम माझ्या आईचा सल्ला घेते. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी तिने मला काही सोप्या युक्त्या शिकवल्या आहेत, त्या मी आवर्जून वापरते. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी आणि अगदी सिंपल मेकअप करणे.
८. मेकअपच्या बाबतीत जे ट्रेंडींग आहे ते मी करत नाही तर मला जे आवडते तेच मी करते. मल्टी टास्कींग प्रॉडक्टस वापरणे मला आवडते. एकूणच कमीत कमी प्रसाधनांचा वापर करुन कमीत कमी मेकअप करण्याला मी प्राधान्य देते.