Lokmat Sakhi >Beauty > त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

Skin Care Treatment With Jaggery: आरोग्यासाठी गूळ जसा पोषक आहे, तसाच तो आपल्या त्वचेसाठीही आहे. म्हणूनच पाहा त्वचेसाठी गुळाचे खास ३ फेसपॅक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 07:00 PM2022-11-17T19:00:07+5:302022-11-17T19:13:22+5:30

Skin Care Treatment With Jaggery: आरोग्यासाठी गूळ जसा पोषक आहे, तसाच तो आपल्या त्वचेसाठीही आहे. म्हणूनच पाहा त्वचेसाठी गुळाचे खास ३ फेसपॅक.

Jaggery face pack specially for winter, jaggery face pack for removing tanning and reducing pimples | त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

त्वचा होईल उजळ आणि पिंपल्स गायब! गुळाचा फेसपॅक- पाहा सुंदर त्वचेचा सिक्रेट फॉर्म्युला 

Highlights३ पद्धतींनी तुम्ही गुळाचा फेसपॅक वापरू शकता. यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ आणि फ्रेश दिसू लागते.

थंडी सुरू झाली की कोरडी- थंड हवा त्वचेला सहन होत नाही. त्यामुळे त्वचा काळी पडते. उन्हाळ्यात जसं टॅनिंग होतं, तसंच थंडीतही त्वचा काळवंडण्याचा त्रास अनेक जणींना होतो. या त्रासावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे गुळाचा फेसपॅक. गुळामध्ये असणारे काही पौष्टिक घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ आणि फ्रेश (home remedies for reducing tanning) दिसू लागते. शिवाय ज्यांना पिंपल्सचा त्रास (how to get rid of pimples?) असतो, त्यांच्यासाठीही हा उपाय विशेष गुणकारी ठरतो. ३ पद्धतींनी तुम्ही गुळाचा फेसपॅक (jaggery face pack) वापरू शकता. 

 

त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे गुळाचे फेसपॅक
१. त्वचेचं टॅनिंग कमी करण्यासाठी

त्वचा खूप काळवंडली असेल अशा पद्धतीने गुळाचा फेसपॅक तयार करा. यासाठी एका वाटीत थोडं पाणी घेऊन त्यात गुळाचा  खडा टाका आणि तो विरघळून घ्या.

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

त्यानंतर त्यात मावेल तेवढे बेसन टाका आणि चिमुटभर हळद टाका. हा फेसपॅक चेहऱ्याला आणि मानेला लावा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चोळून चोळून काढून टाका. चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यानंतर  त्वचेला माॅईश्चरायझर लावा. 

 

२. चमकदार त्वचेसाठी
एका वाटीत एक चमचा मध घ्या. त्यात अर्धे लिंबू पिळा आणि त्यात एक चमचा गुळ टाका. हे साहित्य व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटे फेसपॅक त्वचेवर तसाच राहू द्या.

मिटक्या मारत पाणीपुरी खाणाऱ्या कुत्र्याचा व्हायरल व्हिडिओ! पण ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचेवरचा फेसपॅक काढून टाका. यानंतर चेहरा स्वच्छ धुवनू घ्या. हा उपाय केल्याने डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ- चमकदार दिसेल. 

 

३. पिंपल्स आणि त्वचेवरचे डाग कमी करण्यासाठी
त्वचेवर वारंवार पिंपल्स येत असतील किंवा पिंपल्स गेल्यानंतरही त्यांचे डाग त्वचेवर दिसत असतील तर गुळ पावडर आणि टोमॅटोचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 
 

Web Title: Jaggery face pack specially for winter, jaggery face pack for removing tanning and reducing pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.