Lokmat Sakhi >Beauty > जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

Janhvi kapoors 3 ingredient face mask : त्वचेची काळजी घेताना जान्हवी नेमका कोणता घरगुती फेसपॅक वापरते ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 06:12 PM2024-08-01T18:12:25+5:302024-08-01T18:22:21+5:30

Janhvi kapoors 3 ingredient face mask : त्वचेची काळजी घेताना जान्हवी नेमका कोणता घरगुती फेसपॅक वापरते ते पाहूयात...

Janhvi kapoors 3 ingredient face mask Janhvi Kapoor’s DIY Skincare Secret For Glowing Skin Janhvi Kapoor Shares Her Best DIY Skincare Secrets | जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) अभिनयासोबतच तिच्या निखळ आणि चमकदार त्वचेसाठी फेमस आहे. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आई श्रीदेवीने सुचवलेल्या घरगुती उपायांचा वापर करते. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने सांगितले होते की, ती त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करत नाही, याउलट जान्हवीला आपल्या सुंदर स्किनसाठी शक्य होईल तितके नॅचरल पदार्थ वापरणे आवडते(Janhvi kapoors 3 ingredient face mask).

जान्हवी आपल्या स्किनची काळजी कशी घेते किंवा तिचे स्किन रुटीन काय असते, याबाबत सोशल मिडीयावर सतत व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या स्किनची काळजी घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, ती त्वचेचा ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी एक खास घरगुती उपाय करताना दिसत आहे. जान्हवी म्हणते की, तिला अधून मधून जसा वेळ मिळेल तेव्हा त्वचेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी तिला हा उपाय करायला खूप आवडते. आपल्या त्वचेची काळजी घेताना जान्हवी नेमका कोणता घरगुती फेसपॅक वापरते ते पाहूयात( Janhvi Kapoor’s DIY Skincare Secret For Glowing Skin). 

जान्हवी कपूरचा आवडता फेसमास्क कोणता ? 

आपल्या चेहऱ्यावरील स्किन ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी जान्हवी नेमका कोणता उपाय करते, याविषयीचा व्हिडीओ iam_grincy या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

या फेसमास्कसाठी लागणारे साहित्य :- 

१. दही - १ टेबलस्पून 
२. मध - १ टेबलस्पून 
३. पिकलेलं केळ - १/२ कप (मॅश करुन घेतलेले)
४. संत्र - १ संत्र (दोन भागात अर्धे कापलेलं)  

तांदुळ धुवून पाणी फेकून देण्यापेक्षा करा कोरियन आईस क्युब्स, त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी !


केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

हा फेसमास्क कसा करायचा आणि वापरण्याची पद्धत :- 

१. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात थोडेसे मध आणि मॅश करुन घेतलेले केळं घालावं. 
२. आता हे मिश्रण चमच्याने ढवळून सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावे. 
३. यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून घ्यावे. ८ ते १० मिनिटे चेहऱ्याला हळूवार मसाज करावा. 
४. आता एक संत्र घेऊन बरोबर मधोमध कापा. या दोन भागांपैकी एक तुकडा घेऊन चेहऱ्यावर त्याने थेट ८ ते १० मिनिटे स्क्रबिंग करावे. 
५. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

हा फेसमास्क लावण्याचे फायदे :- 

१. दही :- त्वचेला हायड्रेट आणि मॉईश्चराईज ठेवण्यासाठी दही अत्यंत फायदेशीर ठरते. 

२. मध :- आपल्या त्वचेचा टोन खराब झाल्यास स्किन टोन समान करण्यासाठी मध उपयुक्त मानले जाते. 

३. केळी :- त्वचेसाठी केळ्याचा वापर केल्याने त्वचा टवटवीत आणि तजेलदार होण्यास मदत मिळते. 

 दही, मध, केळी यामुळे त्वचा चांगली हायड्रेट होईल तसेच व्हिटॅमिन 'सी' असणाऱ्या स्क्रबिंगमुळे त्वचेवरचे टॅनिंग, डेड स्किन निघून जाऊन त्वचा छान फ्रेश होईल.

Web Title: Janhvi kapoors 3 ingredient face mask Janhvi Kapoor’s DIY Skincare Secret For Glowing Skin Janhvi Kapoor Shares Her Best DIY Skincare Secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.