Join us  

जपानी ट्रिक, चेहऱ्याला लावा आंबवलेल्या तांदुळाचे पाणी; पहा सुंदर जपानी स्त्रिया ते कसं वापरतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 1:59 PM

जपानी महिला सौंदर्य जपण्यासाठी तांदळाच्या पाण्याचाच (rice water for skin) वापर करतात .पण हे पाणी केवळ तांदूळ धुतलेलं नसतं तर ते आंबवलेलं तांदळाचं पाणी (fermented rice water) असतं. आंबवलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करण्याची पध्दत वेगळी (how to use fermented rice water) आणि त्याचे फायदेही (benefits of fermented rice water) विशेष आहेत.

ठळक मुद्देफर्मेण्टेड राइस वाॅटर तयार करण्याच्या दोन पध्दती आहेत. भात शिजवताना बाजूला काढलेल्या भाताच्या पाण्याच्या तुलनेत फर्मेण्टेड राइस वाॅटर जास्त परिणामकारक असतं. फर्मेण्टेड राइस वाॅटर चेहेऱ्याला थेट वापरु नये. वापरण्यापूर्वी ते सौम्य करणं आवश्यक असतं. 

त्वचेची काळजी (skin care)  घेण्यासाठी तांदळाचं पाणी  (rice water) वापरणं हे कोरियन स्किन केअर रुटीन  (korean  skin care routine) अनेकांन आवडू लागलं आहे. कोरियन महिला आपली त्वचा मऊ, नितळ आणि चमकदार ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर करतात. कोरियन स्त्रियांप्रमाणेच जपानमधील स्त्रियांचंही चेहेऱ्यावर ग्लो येण्यासाठीचं सोपं पण स्पेशल स्किन केअर रूटीन आहे. जपानी महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी 'फर्मेन्टेड राइस वाॅटर'  (fermented rice water) हा फाॅर्म्युला वापरतात. जपानी महिला सौंदर्य जपण्यासाठी तांदळाच्या पाण्याचाच वापर करतात .पण हे पाणी केवळ तांदूळ धुतलेलं नसतं तर ते आंबवलेलं तांदळाचं पाणी असतं. आंबवलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करण्याची पध्दत (how to use fermented rice water) वेगळी आणि त्याचे फायदेही (benefits of fermented rice water)  विशेष आहेत.

Image: Google

फर्मेन्टेड राइस वाॅटरची जपानी ट्रीक काय आहे?

जपानी महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी आंबवलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. यासाठी त्या अर्धा कप तांदूळ, 2 ते 3 कप पाणी घेतात. तांदूळ व्यवस्थित धुवून घेतात . मग तांदळात 2 ते 3 कप पाणी घालून तांदूळ दोन दिवसा भिजत घालताता. दोन दिवसानंतर तांदूळ निथळून घेतात. निथळलेलं तांदळाचं पाणी म्हणजेचं आंबवलेलेलं तांदळाचं पाणी. या पाण्याचा वापर त्या त्वचेसाठी करतात. हे पाणी  त्या थेट चेहेऱ्याला लावत नाही तर 1 चमचा आंबवलेल्या तांदळाचं पाणी घेतल्यास त्यात तेवढंच साधं पाणी घालून  ते सौम्य करतात. मग हे पाणी कापसाच्या बोळ्यानं चेहेऱ्याला लावतात. पाणी लावल्यानंतर चेहेरा 20-25 मिनिटांनी पाण्यानं स्वच्छ धुतात. तांदळाचं आंबवलेलं पाणी हे भात शिजवताना बाजूला काढलेल्या पाण्यापेक्षा जास्त गुणकारी असतं असं जपानी महिला मानतात. त्यामुळे केवळ तांदूळ धुवून  ते पाणी वापरणं किंवा भात शिजवताना बाजूला काढलेलं पाणी वापरण याऐवजी त्या आंबवलेल्या तांदळाच्या पाण्याचा म्हणजेच फर्मेन्टेड राइस वाॅटरचा वापर करतात. 

Image: Google

काय असतं फर्मेन्टेड राइस वाॅटरमध्ये?

सौंदर्य तज्ज्ञ रेणू माहेश्वरी फर्मेन्टेड राइस वाॅटर हे त्वचा आणि केस दोन्हींसाठी उपयुक्त असल्याचं सांगतात. चेहेऱ्याची त्वचा लवचिक होण्यासाठी तसेच त्वचा  घट्ट होवून स्किन एजिंगचा धोका टाळण्यासाठी, त्वचेवर चमक येण्यासाठी फर्मेन्टेड राइस वाॅटर उपयोगी असल्याचं रेणु माहेश्वरी सांगतात. फर्मेन्टेड राइस वाॅटरमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतं. या पाण्यात असलेल्या क जीवनसत्वामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते. फर्मेन्टेड राइस वाॅटरमध्ये दाह आणि सूज विरोधी घटक असल्यानं चेहेऱ्यावरील सूज आणि त्वचेला येणारी खाज या समस्याही दूर होतात. रेणू माहेश्वरी फर्मेन्टेड राइस वाॅटर तयार करण्याची आणखी एक पध्दत सांगतात. 1 कप तांदूळ घ्यावेत. ते स्वच्छ धुवून् घ्यावेत. हे तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवावेत. अर्ध्या तासानंतर तांदूळ निथळून पाणी बाजूला काढावं. तांदळाचं हे पाणी एका भांड्यात काढून पाणी झाकून ठेवावं. भांडं हवा, पाणी, सूर्यप्रकाश येणार नाही अशा जागी 3-4 दिवस ठेवावं. अशा पध्दतीनं हे पाणी आंबंत आणि मग हे पाणी त्वचेसाठी  आणि केसांसाठी वापरावं असं रेणू माहेश्वरी सांगतात. 

Image: Google

कसं वापरायचं फर्मेण्टेड राइस वाॅटर?

1. फर्मेण्टेड राइस वाॅटर टोनरसारखं वापरता येतं. यासाठी 1 कप फर्मेण्टेड राइस वाॅटर, 3 मोठे चमचे गुलाब पाणी, 1 मोठा चमचा लिंबाचा रस घ्यावा. एका स्प्रे बाॅटलमध्ये फर्मेण्टेड राइस वाॅटर, गुलाब पाणी एकत्र करावं. ते व्यवस्थित हलवून बाटलीला झाकण लावून ठेवावं. त्वचा तेलकट असल्यास या मिश्रणात लिंबाचा रसही घालावा.  चेहेरा धुतला की टोनर प्रमाणे हे मिश्रण वापरता येतं. 

Image: Google

2. फर्मेण्टेड राइस वाॅटर फेस पॅकही तयार करता येतो. यासाठी 1 छोटा चमचा कोरफड जेल आणि 1 छोटा चमचा फर्मेण्टेड राइस वाॅटर घ्यावं. एका वाटीत या दोन्हे गोष्टी घेऊन त्या चांगल्या मिसळून घ्याव्यात. हे मिश्रण चेहेऱ्याला गोलाकार मसाज करत लावावं. 4-5 मिनिटं या मिश्रणानं चेहेऱ्याला मसाज केल्यानंतर 20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा उपाय नियमित केल्यास त्याचा त्वचेवर चांगला परिणाम जाणवतो.  

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सजपानहोम रेमेडी