Join us  

केस पातळ झालेत? जावेद हबीब सांगतात घरीच केस सेट करण्याची सोपी ट्रिक, दाट-स्ट्रेट दिसतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 3:33 PM

Javed Habib tells a simple trick to set hair at home : केस स्ट्रेट करण्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीच्या हेअर स्ट्रेटनरचा वापर करा.

केस चांगले ठेवण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर्स उपलब्ध आहेत. (Hair Care Tips) महागडे शॅम्पू वापरून पैसे खर्च करूनही केसांवर हवातसा परिणाम दिसून येत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस सेट करताना कोणत्या चुका टाळाव्यात याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बरेच लोक  घरच्याघरी केस सेट करताना चुका करतात. ज्याामुळे केस खराब होतात. (Javed Habib tells a simple trick to set hair at home)

जावेद हबीब सांगतात की, ''केस सेट करण्याासाठी सगळ्यात आधी व्यवस्थित सेक्शन पाडून घ्या.  त्यानंतर केसांवर स्ट्रेटनिंग रॉड फिरवा. स्ट्रेटनिंग मशिनचा रॉड कधीच हाय टेम्परेचरवर नसावा. ज्यामुळे केस डॅमेज होण्याचा धोका असतो. जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर प्री कंडिशनिंग करायला विसरू नका. 

केस स्ट्रेट करण्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीच्या हेअर स्ट्रेटनरचा वापर करा. कारण खराब क्वालिटीच्या हेअर स्ट्रेटनरमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. कोणतंही प्रोडक्ट विकत घेण्याआधी त्याचा रिव्हिव्ह वाचायला विसरू नका. ज्यातून तुम्हाला आयडिया येईल किंवा केसांसाठी काय  चांगले आहे आणि केसांना काय सुट होत नाही.

स्ट्रेटनिंग करण्याआधी केस लहान लहान सेक्शन्समध्ये विभागून घ्या. नंतर एक एक सेक्शन घेऊन व्यवस्थित स्ट्रेट करा. घाईघाईत लोक मोठे सेक्श्न्स घेतात ज्यामुळे केस स्ट्रेट होत नाहीत आणि त्याचा पॉझिटिव्ह रिजल्टही मिळत नाही. केस खराब होण्याचा धोकाही जास्त असतो म्हणून चांगला परिणामांसाठी केस छोट्या छोट्या सेक्सश्नमध्ये विभागा. 

केसांची स्ट्रेटनिंग करण्याआधी शॅम्पूने केस नक्की धुवा. कारण स्काल्पवर धूळ, घाणं, जाम झालेली असते. स्ट्रेटनरच्या संपर्कात आल्यामुळे स्काल्पचे नुकसान होते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही केस स्ट्रेट कराल तेव्हा  शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. हेअर स्ट्रेटनिंग करताना तापमान चेक करायला विसरू नका. केस खूपच नाजूक असतील किंवा हिट सहन करू शकत नसतील तर केस लवकर खराब होऊ शकतात. म्हणून मशिनचे तापमान नेहमी नॉर्मल राहील असे पाहा. तापमान नॉर्मल ठेवल्यामुळे तुम्हाला रिजल्ट लवकर पाहायला मिळेल असं नाही. 

ओल्या केसांवर  स्ट्रेटनिंग करू नका. ओल्या केसांवर स्ट्रेटनिंग केल्यामुळे केस लवकर स्ट्रेट  होतात असं नाही. असे केल्याने केस तुटतात. म्हणून हेअर्स स्ट्रेटनिंग करताना केस पूर्णपणे सुकवून घ्या.  ओल्या केसांवर आयर्निंग केल्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी