Join us  

महागड्या ट्रिटमेण्ट केल्यावर केसांना तेल लावावे की नाही ? हेअर एक्सपर्ट सांगतात, एक सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 7:50 PM

Jawed Habib : How to take care of your hair after taking a hair treatments : हेअर एक्सपर्ट जावेद हबीब सांगतात महागड्या हेअर ट्रिटमेण्टनंतर केसांची काळजी कशी घ्यायची ?

स्त्री असो किंवा पुरुष 'केस' हा सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. आपले केस काळेभोर, घनदाट, लांबसडक व्हावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. केसांचे आरोग्य व नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती किंवा आर्टिफिशियल उपायांचा वापर करतो. काहीवेळा तर आपण केसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिटमेंट्स करून घेण्यासाठी महागडं सलोन किंवा ब्युटी पार्लर गाठतो. मोठमोठाल्या स्पा सेंटर्स, सलोन किंवा पार्लरमध्ये जाऊन आपण हेअर केरेटिन, रिबॉन्डिंग, स्मूथिंग यांसारख्या हेअर ट्रिटमेंट्स करून घेतो. या महागड्या ट्रिटमेंट्स केल्याने केसांचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. केस मऊ होतात आणि खूप चमकदारही दिसतात. 

केसांच्या अनेक ट्रिटमेंट्स करून केसांच्या सौंदर्यात भर तर पडते परंतु त्यानंतर केसांची तितकीच जास्त काळजी घ्यावी लागते. इतक्या महागड्या ट्रिटमेंट्स करुन जर आपण केसांची योग्य ती निगा नाही राखली तर केस खराब होतात. याचबरोबर केसांची चुकीची काळजी घेतल्याने या हेअर ट्रिटमेंट्सचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि काही वेळाने केस खराब होऊन गळू लागतात. अशा परिस्थितीत केसांसाठी कोणतीही ट्रिटमेंट घेतल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, (Can We Do Hair Oiling After Taking a Hair Treatments) असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतो. या संदर्भात सुप्रसिद्ध हेअर एक्स्पर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी हेअर ट्रिटमेंट्स घेतल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी, केसांना तेल लावावे की लावू नये याबद्दल माहिती दिली आहे(Jawed Habib : Can We Do Hair Oiling After Taking a Hair Treatments).

जावेद हबीब सांगतात हेअर ट्रिटमेंट्सनंतर केसांना तेल लावावे की.... 

नुकतेच जावेद हबीब (Jawed Habib) यांनी सोशल मीडियावर इंस्टाग्राम व्हिडीओ शेअर करून हेअर स्मूथिंग, केराटिन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या केसांच्या ट्रिटमेंट्सनंतर केसांना तेल लावावे की नाही, हे सांगितले आहे. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की उपचारानंतर केसांना तेल लावल्याने उपचारांचा प्रभाव कमी होतो आणि केस खराब होतात. तर काहींना केसांना तेल लावणे आवडते.

केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस...

मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...

जावेद हबीब (Jawed Habib) यांनी सांगितले की, जर आपण कोणतीही हेअर ट्रिटमेंट घेतली असेल तर आठवडाभर केसांना तेल लावू नये. परंतु हेअर ट्रिटमेंट करुन एक आठवडा पूर्ण झाला की आपण केसांना कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक तेल लावू शकता. केसांना तेल लावल्याने केस निरोगी राहतात आणि तुटत नाहीत.  

'सर जो तेरा चकराये'.. अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय केसांना चंपी करताना नेमकं कोणतं तेल वापरणं उत्तम...

महागडे तेल-शाम्पू -केमिकल्सचा मारा टाळा, जावेद हबीब सांगतात सुंदर केसांसाठी ५ नॅचरल उपाय...

हेअर ट्रिटमेंट्सनंतर केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत... 

जावेद हबीब यांनी सांगितले की, जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या हेअर ट्रिटमेंटनंतर केसांना तेल लावायचे असेल तर ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपल्या केसांना संपूर्णपणे म्हणजेच टाळूपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत तेल लावावे, पण तेल लावल्यानंतर केसांना आणि मुळांना जास्त मसाज करणे टाळावे.

महागडे प्रयोग कशाला, ५ सोपे उपाय-केस गळणं बंद ! जावेद हबीब सांगतात सोपे स्मार्ट उपाय...

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स