Join us  

केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती? भराभर केस वाढण्यासाठी जावेद हबीबचा सल्ला; रोज ‘हे’ तेल वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:08 PM

Jawed Habib For Hair Growth : कांद्याचा रस गळणाऱ्या केसांचा त्रास कमी  करतो.

गळणाऱ्या केसांची समस्या घराघरांतील महिलांना उद्भवते. पुरूषांनाही कधी कधी या समस्येचा सामना करावा लागतो. केस सतत गळल्यानं टक्कल पडू लागते. (How to Stop Hair Fall)  केसांवर  केमिकल्सयुक्त तेल, शॅम्पूचा वापर करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केले तर चांगले परीणाम दिसून येतील. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) यांनी केस गळणं कमी करण्यासाठी सोपा घरगुती उपाय सुचवला आहे. यामुळे केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होईल.  याशिवाय केसांची वाढही चांगली होईल. (Hair Care Tips)

जावेद हबीब यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते कांद्याचा रस (Onion Juice) मिसळताना दिसत आहे.  कांद्याचा रस गळणाऱ्या केसांचा त्रास कमी  करतो. जावेद यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या रसानं तुम्ही  गळणाऱ्या केसांची समस्या दूर कर शकता. हा रस नवीन केस येण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. हा रस थेट केसांवर किंवा टाळूवर वापरता येतो. बोटांनी डोक्यावर कांद्याचं तेल किंवा रस लावू शकता किंवा ते कापसाच्या मदतीने देखील लावता येते.

१) केसांवर कांद्याचा रस लावण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्याच्या रसात एंटी ऑक्सिडंट्स असतात जे केसांसाठी फायेदशीर ठरतात.  त्यात कॅटालेस नावाचे एन्झाईम असते जे हायड्रोजन पेरोक्साईड तोडण्यास मदत करते आणि केसांच्या वाढीचे चक्र सुधारते.

२) सल्फर युक्त कांदा केसांची मूळं सुधारण्यासाठी प्रभावी आहे. केस जास्त पातळ होतात आणि तुटायला लागतात कांद्याचा रस ही समस्या दूर करतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात आणि ते टाळूचे पोषण करून केसांच्या वाढीस मदत करते.

कमी वयात केस पिकलेत? मग डायची झंझट कशाला, २ घरगुती उपाय, केस करा कायमचे काळे

३) कांद्यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या दूर होते. कांद्याचा परिणाम कोंड्यापासून मुक्त होण्यातही दिसून येतो. डोक्यात खाज येत असेल आणि जमा होत असेल तर कांद्याचा रस पिल्याने फायदा होतो. या रसामुळे टाळूमध्ये ओलावा मिळतो आणि खराब झालेले केसही दुरुस्त होतात. रोजच्या जेवणात कांद्याचा समावेश केल्यास केस गळतीपासूनही आराम मिळतो. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स